आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:निधी नसतानाही कामे पूर्ण करण्यासाठी दबाव; कंत्राटदारांचा काम बंदचा इशारा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते दुरूस्ती, पूल, काँक्रिटीकरण, इमारत बांधकाम ही विविध कामे शासकीय कंत्राटदारांकडून केली जातात. या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला नसताना कामे वेळेत करण्यासाठी शासकीय दबाव आणला जाताे. प्रलंबीत बिले निघत नसल्याने ही कामे कशी करावी? असा प्रश्न करीत शासकीय कंत्राटदार संघटनेतर्फे शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापुढे लक्षवेधी आंदाेलन करण्यात आले.

सप्टेंबर २०२२ या महिन्याअखेरीस प्रलंबीत कामांसाठी शासनाने सर्व विभागांना ३०० काेटी रूपयांचा निधी दिला. त्यात जळगाव जिल्ह्यासाठी केवळ २९ काेटी रूपये आहेत. मागील बिले निघत नसल्याने कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कंत्राटदार सुरू असलेली कामे देखील पूर्ण करू शकत नाहीत. या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी कंत्राटदार संघटनेतर्फे शुक्रवारी आंदाेलन करण्यात आले. संघटनेतर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेवून त्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी संघटनेेचे अध्यक्ष अभिषेक काैल, संजय पाटील, शिवाजी भंगाळे, विरेंद्र पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्यामकांत साेनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...