आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाव वाढले:टोमॅटोचे दर तब्बल 80 रुपये किलोपर्यंत; लसूण शंभर रुपयाला चार किलो

जळगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात गेल्या आठवड्यापासून टोमॅटोच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सध्या हे दर ८० रुपये किलोवर पोहोचल्याने महिलांचे बजेट कोलमडले आहे. जळगावात नाशिक भागातून टोमॅटोंची आवक कमी प्रमाणात होत असल्याने हे दर वाढल्याचे सांगितले जाते. पावसाळ्यात काहीअंशी हे दर कमी होतील. स्वयंपाकात बहुतांश वापर होणाऱ्या टोमॅटोचे दर वाढल्याने चिंता वाढली आहे.

साधारणत: महिनाभर टोमॅटोचे भाव तेजीत राहण्याची शक्यता भाजीपाला विक्रेत्यांकडून वर्तवली जाते आहे. हिरवी मिरचीही आता महागली आहे. लसणाचे दर खूपच कमी झाले आहेत. पांढरा लसूण शंभर रुपयाला चार किलो अशा भावाने विक्री होतो आहे.

बातम्या आणखी आहेत...