आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मरण:गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, शैक्षणिक साहित्य‎ वाटपातून शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, संघटना, राजकीय पक्षांतर्फे रविवारी राजर्षी‎ शाहू महाराज यांची जयंती साजरी झाली. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, शैक्षणिक साहित्य वाटप, वक्तृत्व‎ स्पर्धांतून शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. चर्चासत्र आणि परिसंवादही घेण्यात आले.‎

रमाई फाऊंडेशनतर्फे प्रतिमापूजन‎ सुयोग कॉलनीतील रमाई फाउंडेशनतर्फे राजर्षी‎ शाहू महाराज यांच्या १४८व्या जयंती निमित्त‎ त्यांना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी‎ महिलाआघाडीच्या महानगर अध्यक्षा मंगला‎ पाटील यांनी प्रतिमापूजन केले. उषा महाजन,‎ फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन अहिरे, सचिव‎ आनंद महाजन, नरेंद्र सावळे, राहुल बऱ्हाटे,‎ अनिला साळवे आदी उपस्थित होते.‎ रिपाइं खरात गट महानगर शाखा‎ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाच्या खरात गटातर्फे‎ महानगर शाखेतर्फे रिपांइचे जिल्हाप्रमुख जे. डी.‎ भालेराव यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.‎

महानगराध्क्ष सिद्धार्थ गव्हाणे, जिल्हा उपप्रमुख‎ अनिल चंद्रे, प्रकाश सोनवणे, दीपक बिऱ्हाडे,‎ महेंद्र परदेशी, बळीराम हिरे, नितीन गवळी,‎ आकाश अंभोरे, विजय पाटील, बापू बिऱ्हाडे,‎ नरेंद्र परदेशी, शरद धनगर, नीखिल गुजर,‎ अजीज शेख, छाया वाघ, फिरोज पिंजारी, नरेंद्र‎ सपकाळे, रईस काकर उपस्थित होेते.‎ संस्कृती माध्यमिक विद्यालय‎ जय दुर्गा महिला फाउंडेशन संचलित संस्कृती‎ माध्यमिक विद्यालयात शाहू महाराजांच्या‎ प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका‎ सी. डी. येवले यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण‎ केला. एम. वाय. फालक यांनी कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन केले. जे. डी. सोनवणे यांनी आभार‎ मानले.‎ राज प्राथमिक विद्यालय‎ मेहरूण परिसरातील रंगालक्ष्मी बहुउद्देशीय संस्था‎ संचलित राज माध्यमिक विद्यालयात सामाजिक‎ न्याय दिन साजरा झाला.

मुख्याध्यापक सी.व्ही.‎ पाटील यांनी प्रतिमेचे पूजन केले. डी.वाय बऱ्हाटे‎ यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्याची माहिती‎ दिली. एस. एस. सुरवाडे यांनी सूत्रसंचालन केले.‎ एस. ए. खंडारे यांनी आभार मानले.‎ जिजामाता माध्यमिक विद्यालय‎ न्यू जागृती मित्र मंडळ संचलित जिजामाता‎ माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक राजेंद्र‎ खोरखोडे यांनी प्रतिमापूजन करून माल्यार्पण‎ केले. या वेळी शिक्षक किशोर पाटील, अशोक‎ पाटील, कृष्णा महाले, दिनेश सोनवणे, विकास ‎तायडे, प्रशांत मडके आदी उपस्थित होते. ‎ ‎

सूत्रसंचालन संगीता पाटील तर आभार प्रदर्शन‎ दिनेश सोनवणे यांनी केले.‎ दर्जी फाउंडेशनतर्फे व्याख्यान‎ दर्जी फाउंडेशनतर्फे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.‎ संचालक प्रा. गोपाल दर्जी यांनी आधुनिक‎ काळात युवकांनी छत्रपती शाहू महाराज यांचे‎ विचार अंगीकृत करणे ही काळाची गरज‎ असल्याचे सांगितले. सध्याची आपली गुंतवणूक ‎म्हणजे फक्त कौशल्ययुक्त शिक्षण असायला‎ हवे. प्रत्येकाला समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी ‎ शिक्षण ही ज्ञानगंगोधरी आहे. असे मत प्रा.‎ गोपाल दर्जी यांनी व्यक्त केले. संचालिका ज्योती दर्जी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियोजन केले.‎ बहुजन समाज पार्टी‎ बहुजन समाज पार्टी जळगाव विधानसभा‎ क्षेत्रातर्फे शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात ‎ ‎ आले.

जिल्हा सचिव प्रवीण परदेशी यांनी‎ छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची माहिती‎ दिली. मुकेश कोचुरे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण‎ केला. सचिन बाविस्कर, पप्पू खाटीक, दस्तगीर‎ खाटीक, मनोज वाघ, दीपक साबळे, दगा साबळे‎ आदी उपस्थित होते.‎ राजर्षी शाहू युवा ब्रिगेड‎ अखिल भारतीय राजर्षी शाहू ब्रिगेडप्रणित युवा‎ ब्रिगेडतर्फे शाहू महाराज जंयतीनिमित्त विद्यार्थांना‎ शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.‎ संघटनेचे अध्यक्ष यश पाटील यांनी प्रतिमापूजन‎ केले व शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर माहिती‎ दिली. प्रदेशाध्यक्ष दीपक कोल्हे, अनिकेत‎ सपकाळे, सुमित भंगाळे, बादल राजपूत, सोहम‎ पाटील, यश भंगाळे, तेजस भारंबे, चेतन राजपूत,‎ मयूर शिरसाठ उपस्थित होते.‎

मानव सेवा विद्यालय‎ मानव सेवा विद्यालयात राजश्री शाहू महाराजांच्या‎ जयंतीनिमित्ताने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची‎ वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. धनश्री कापडे,‎ धनश्री पाटील, वैष्णवी सपकाळे, जान्हवी‎ चौधरी, परेश चौधरी, राधिका सुतार, जागृती‎ बाविस्कर, नेहा लिंडायत या विद्यार्थ्यांनी शाहू‎ महाराजांच्या जीवन कार्यावर वक्तृत्व केले.‎ मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, माया अंबटकर,‎ मुक्ता पाटील यांनी शाहू महाराजांच्या जीवन‎ कार्याचा परिचय करून दिला. अध्यक्ष डॉ. आर.‎ एस. डाकलिया, उपाध्यक्ष सुरेश कावडिया,‎ सचिव विश्वनाथ जोशी, कोषाध्यक्ष घेवरचंद‎ राका, सदस्य कोमलकुमार डाकलिया आदींनी‎ प्रतिमापूजन केले.

गिरीश जाधव यांनी‎ सूत्रसंचालन केले.‎ बहिणाबाई विद्यालय‎ बहिणाबाई ज्ञानविकास संस्था संचालित‎ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राजश्री शाहू‎ महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस‎ म्हणून साजरी करण्यात आली. अध्यक्ष‎ मुख्याध्यापक टी. एस. चौधरी यांनी प्रतिमा पूजन‎ केले. प्रतिभा खडके यांनी राजर्षी शाहू महाराज‎ यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती‎ दिली. मुख्याध्यापक राम महाजन, डॉ. विलास‎ नारखेडे, डॉ. प्रतिभा राणे, स्वाती कोल्हे, सीमा‎ चौधरी, संतोष पाटील, विशाल पाटील, दिनेश‎ चौधरी, चंद्रकांत पाटील, शंकर चव्हाण, संतोष‎ सोनार, दुर्गादास कोल्हे, जगदीश नेहेते उपस्थित‎ होते. पी. पी. चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.‎ आर. एस. वाणी यांनी आभार मानले.‎