आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वसुंधरा अभियानात शेंदुर्णी नगरपंचायतीचा गौरव; पर्यावरण संवर्धनासाठी राबवलेल्या उपक्रमांची दखल, राज्यात उमटवला ठसा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘माझी वसुंधरा अभियान २’मध्ये जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरपंचायतीचा उत्कृष्ट कामगिरी केल्याने गाैरव करण्यात आला. राज्याचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्या वतीने हा सन्मान झाला. विभागाचीही उत्कृष्ट कामगिरी झाल्याने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा सत्कार करण्यात आला

जिल्ह्याचा सन्मान जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी स्वीकारला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन संरक्षण आणि जतन करण्यासाठी जिल्ह्याच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन सन्मान करण्यात आला. जागतिक पर्यायवरण दिनाचे औचित्य साधून हा सोहळा पार पडला. शेंदुर्णी नगरपंचायतीचा शासनातर्फे गौरव झाल्याने, जिल्ह्यात पर्यावरण संवर्धन चळवळीला आता अधिक बळ मिळणार आहे.

वृक्षसंवर्धन चळवळीला बळ : निसर्ग संपदांचा होणारा ऱ्हास थांबावा या उद्देशाने ‘माझी वसुंधरा’ अभियान शासनातर्फे राबवले जाते. त्यात विविध उपक्रम व कार्यक्रमांवर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यातून या अभियानांतर्गत शेंदुर्णी नगरपंचायतीचा सन्मान करण्यात आला आहे.

फिल्ड असेसमेंटमध्ये १५ ग्रामपंचायती
‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत ६५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी डेक्सटॉप असेसमेंटमध्ये एकूण १५ ग्रामपंचायतींची फिल्ड असेसमेंटसाठी निवड करण्यात आलेली होती. त्यात पातोंडा व दहिवद (ता. अमळनेर), मानमोडी (ता. बोदवड), अडावद व चहार्डी (ता. चोपडा), आसोदा (ता. जळगाव), पहूरपेठ (ता. जामनेर), अंतुर्ली व सालबर्डी (ता. मुक्ताईनगर), पिंपळगाव बुद्रुक (ता. पाचोरा), चिनावल आटवाडे (ता. रावेर), उंबरखेड (ता. चाळीसगाव), न्हावी व मारुळ (ता. यावल) या ग्रामपंचायतींचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...