आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील डोंगरकोठारा येथील रहिवासी तथा महानिर्मितीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने जलपुनर्भरणाची संकल्पना सुचवणारे पत्र पीएमओला लिहिले होते. त्याची दखल घेत दिल्लीतील पीएमओ कार्यालयाने त्यांना संपर्क करून संकल्पना समजून घेतली.
डोंगरकठोरा येथील रहिवासी पुरुषोत्तम इच्छाराम ठोमरे हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ते सध्या शेती करतात. तसेच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात हा कार्यक्रम नियमित ऐकतात. यादरम्यान त्यांनी भूजल पूनर्भणाबाबत सूचवलेली संकल्पना पीएमओ कार्यालयास मेलद्वारे कळवली. नंतर पत्रदेखील पाठवले.
यानंतर काही दिवसांनी पीएमओ कार्यालयातून थेट पुरुषोत्तम ठोमरे यांना संपर्क करण्यात आला. जलपुनर्भरणाची त्यांची नेमकी संकल्पना काय आहे? त्याचा कसा फायदा होईल? हे समजून घेण्यात आले. दरम्यान, थेट देशाच्या पंतप्रधान कार्यालयातून आलेल्या कॉलमुळे शेतकरी ठोमरे हे भारावून गेले आहेत.
अशी आहे संकल्पना
पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर अतिरिक्त पाणी पात्रातून वाहून जाते. भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून हे वाहून जाणारे पाणी दोन्ही बाजूने ठिकठिकाणी नदीपात्रातून वरील भागात वळवावे. काही ठरावीक अंतरानंतर वळवलेले पाणी पुन्हा नदीपात्रात सोडता येईल अशी व्यवस्था करावी. म्हणजे ते उताराच्या दिशेने खाली जमिनीत पाझरेल. परिणामी वाहून जाणारे पाणी वाया न जाता ते वळवलेल्या भागात जमिनीत जिरून भूजल पातळी वाढेल, अशी शेतकरी ठोमरे यांची संकल्पना आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.