आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेशर्स पार्टीचे आयोजन:डॉ.बेंडाळे कॉलेजमध्ये मिस फ्रेशरचा बहुमान प्रिया परिहार हिने पटकावला

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनींकडून फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्या डॉ. गौरी राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अकरावीच्या विद्यार्थिनींचे बारावीतील विद्यार्थिनींनी स्वागत केले. या निमित्ताने विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमात समूह नृत्य व गीतगायन करून कार्यक्रमात रंगत आणली. तसेच मिस फ्रेशर २०२२साठी चुरशीची स्पर्धा झाली. त्यातून मिस फ्रेशरची निवड करण्यात आली. मिस फ्रेशर २०२२चा बहुमान प्रिया परिहार हिने पटकावला. उपप्राचार्य सुनीता पाटील यांच्या हस्ते मिस फ्रेशरला मुकुट देऊन सन्मानित करण्यात आला. या वेळी एन. जी. बावस्कर, के. सी. वंजारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...