आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:द्वारकानगर गणेश मंडळातर्फे बक्षीस वितरण

नशिराबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील द्वारकानगर गणेश मंडळातर्फे गणेशाेत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच पंकज महाजन, माजी सरपंच विकास पाटील, नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, गणेश चव्हाण, नशिराबाद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जनार्दन माळी, संभाजी पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आला. कार्यक्रमाचे नियाेजन मंडळाचे अध्यक्ष ललित महाजन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले.

यांना मिळाले बक्षीस : संगीत खुर्ची स्पर्धेत माेठा गट प्रथम क्रमांक स्नेहल माळी, द्वितीय क्रमांक सोनल पाटील, लहान गट प्रथम क्रमांक अश्विनी पाटील, द्वितीय क्रमांक मोहित कावळे, चित्रकला स्पर्धेत प्रथम सुजल राणे, द्वितीय पर्णवी चौधरी, लहान गटात प्रथम आर्या पाटील, रांगोळी स्पर्धेत प्रथम एकता माळी, स्लो सायकल स्पर्धेत प्रथम नीरज माळी, द्वितीय अर्णव माळी, स्मरणशक्ती स्पर्धेत प्रथम कल्पेश पाटील, द्वितीय खुशी पाचपांडे हे विजयी झाले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते गाैरविण्यात आले. कार्यक्रमात गुंजन फराटे हिने जेईईत यश मिळवल्याने तिचा सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...