आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर, उपमहापौरांनी लेझीमवर धरला ठेका:जळगावमध्ये मानाच्या बाप्पाची वाजत-गाजत मिरवणूक; बाप्पावर गुलाल अन् फुलांची उधळण

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगावात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली असून, या विसर्जन मिरवणुकीत जळगाव शहरातील सुमारे 65 सार्वजनिक गणपती मंडळे सहभागी झाली आहेत. या मिरवणुकीत सर्वात पुढे महापालिकेचा मानाचा गणपती आहे. या मानाच्या मिरवणुकीत महापौर , उपमहापौर आणि आयुक्तांसह मान्यवरांनी लेझीमवर ठेका धरला.

उपमहापौर, महापौरांनी मिरवणूकीत धरला ठेका

शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मिरवणुकीत महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी सहभाग घेतला. गेल्या दोन वर्षांपासून मिरवणूक स्थगित करण्यात आली होती. पण, यावर्षी मानाच्या गणपती मिरवणूकीत नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. अनंत चतुर्दशीनिमित्त जळगावच्या पाच मानाच्या गणपतींना आज निरोप देण्यात आला. यावेळी या बाप्पाच्या मिरवणुकीत भक्तांनी आनंद लूटला.

मंडळांचा उत्साह शिगेला

पोलिस प्रशासनातर्फे मिरवणुकीत ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महापालिकेने मिरवणूक मार्गात ठिकठिकाणी सुरक्षा कठडे उभारले आहेत. दुपारी पाच वाजेपर्यंत मानाचा गणपती महापालिकेच्या मंडळातर्फे विसर्जन करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान ढोल ताशे आणि गणरायाच्या जयघोषाने जळगाव नगरी दुमदुमली आहे. मिरवणुकीत भव्य गणेश मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

शहरात चोख पोलिस बंदोबस्त

गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. सुमारे 800 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तावर तैनात करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

65 मंडळांचा सहभाग

जळगावात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या विसर्जन मिरवणुकीत शहरातील 65 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी झाली आहेत. विसर्जन मिरवणुकीत सर्वात पुढे महापालिकेचा मानाचा गणपती आहे. त्यानंतर इतर गणेश मंडळाचे गणपती या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...