आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळ वाटप:माहेश्वरी समाजातर्फे महेश नवमीनिमित्त शोभायात्रा ; पांजरपोळ गोशाळेत गोसेवा, सिव्हिलमध्ये फळ वाटप

जळगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश नवमी हा दिवस माहेश्वरी समाजाच्या वंश उत्पत्ती दिनाचे प्रतीक म्हणून देशभरात साजरा केला जातो. या निमित्ताने माहेश्वरी समाजातर्फे बुधवारी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी समाजबांधवांनी काढलेल्या शोभायात्रेने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले होते. महेश नवमीनिमित्त पहाटे ६.३० वाजता ‘बालाजी मंदिर संस्थान’ येथे अभिषेक व आरती, पांजरपोळ गोशाळेत अ.भा. माहेश्वरी सभेच्या संघटन मंत्री शैला कलंत्री यांच्या हस्ते गोसेवा, अयोध्यानगर येथील महादेव मंदिरात सकाळी ९.३० वाजता आरती, सकाळी १० वाजता वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांच्या उपस्थितीत स्व. मोतीभाऊ दहाड परिवारातर्फे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम, सकाळी १०.३० वाजता माहेश्वरी बोर्डिंग येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्याम कोगटा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. सायंकाळी ५ वाजता माहेश्वरी बोर्डिंग येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात समाजबांधव सहभागी झाले होते.

विवाह समितीतर्फे परिचय संमेलनच्या वेबसाइटचे उद्घाटन माहेश्वरी बोर्डिंग येथे सायंकाळी श्री जळगाव विवाह सहयोग समितीतर्फे २९ व्या उच्च शिक्षित परिचय संमेलनाच्या वेबसाइटचे उद्घाटन जिल्हा सभेचे अध्यक्ष अॅड.नारायण लाठी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दीपक लढ्ढा, विजय झंवर,डॉ. जगदीश लढ्ढा, वासुदेव बेहेडे, सुभाष जाखेटे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी नगरसेवक राधेश्याम कोगटा, ॲड. नारायण लाठी, माणकचंद झंवर, प्रा. संजय दहाड, मनीष झंवर,केदारनाथ मुंदडा, योगेश कलंत्री,विलास काबरा, राधा झंवर, चंचल तापडिया, अरुणा मंत्री, ऊर्मिला झंवर,तेजस देपुरा, दीपक लढ्ढा, ॲड. प्रवीण झंवर, ॲड. सुरेंद्र काबरा, ॲड. विजय काबरा, जितेंद्र मंडोरा, शिवनारायण तोष्णिवाल, राकेश लढ्ढा, संजय चितलांगे, सत्यनारायण मंडोरा,प्रमोद हेडा आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...