आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक‎:संत तुकाराम महाराज बीज‎ महाेत्सवानिमित्त मिरवणूक‎

जळगाव‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री काथार (कंठहार) वाणी समाज‎ सेवा संघातर्फे जगद‌्गुरू श्री संत‎ तुकाराम महाराज बीज महाेत्सवाचे‎ ९ मार्च राेजी सकाळी ८.३० वाजता‎ शेठ नागाे गणू वाणी मंगल कार्यालय‎ व छात्रालय गुजराथी गल्ली‎ जिल्हापेठ येथे आयाेजन करण्यात‎ आले आहे.‎ कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून‎ पालकमंत्री गुलाबराव पाटील,‎ आमदार सुरेश भाेळे, महापाैर‎ जयश्री महाजन, विराेधी पक्ष नेते‎ सुनील महाजन, उपमहापाैर‎ कुलभूषण पाटील, शिवसेना नेते‎ विष्णू भंगाळे उपस्थित राहणार‎ आहे.

कार्यक्रमात सकाळी ८.३०‎ वाजता संत तुकाराम महाराज‎ यांच्या प्रतिमेचे पूजन, दुपारी ४‎ वाजता भव्य मिरवणूक, रात्री ८ ते‎ १० वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम‎ हाेणार आहे. या कार्यक्रमास‎ नागरिकांनी सहभागी व्हावे, असे‎ आवाहन संत तुकाराम महाराज‎ बीज महाेत्सव समितीचे प्रमुख‎ याेगेश वाणी, उपसमिती प्रमुख‎ किशाेर वाणी, नीलेश वाणी,‎ रामप्रसाद वाणी, शंकर वाणी यांनी‎ केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...