आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दाेन दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केले. परंतु आजही कट्टर शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे असल्याचा संदेश देण्यासाठी तसेच समर्थनार्थ जळगाव शहरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले हाेते. यावेळी ठाकरेंच्या समर्थनार्थ जाेरदार घाेषणाबाजी करण्यात आली.
शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. चाळीस आमदारांनी बंडाचा झेडा फडविल्यानंतर ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दाखविण्यासाठी शिवसेना महानगराच्यावतीने रॅली काढण्यात आली. गाेलाणी मार्केटमधील पक्ष कार्यालयापासून शेकडाे शिवसैनिकांनी टाॅवर चाैकापर्यंत घाेषणाबाजी करत रॅली काढली. यावेळी आजही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मानणारा शिवसैनिक आहे. यापुर्वीही अनेक संकटे आली पण त्या संकटांवर मात करत शिवसेना नव्या दमाने उभी राहील. यापुढेही अविरत उभी राहील असा विश्वास सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे,महानगरप्रमुख शरद तायडे, महापाैर जयश्री महाजन यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे व त्यांच्यासाेबतच्या आमदारांनी स्वगृही परत यावे असे भावनिक आवाहनही यावेळी करण्यात आले. दरम्यान घाेषणाबाजीने परिसर दणाणून गेला हाेता. याप्रसंगी नगरसेवक प्रशांत नाईक, सचिन पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख शाम कोगटा, संघटक दिनेश जगताप, समन्वयक अंकुश कोळी, उपमहानगर प्रमुख नितीन सपके, गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर, संतोष पाटील, महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी, मंगला बारी, ज्योती शिवदे, सरिता माळी, जितु साळुंखे,आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.