आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारभाव:उत्पादन 50 टक्के घटले, लिंबू सव्वाशे रुपये किलो

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यंदा अवकाळी पावसाने बहार कमी, जूनमध्ये भाव आवाक्यात येणार

हवामानातील बदल, अवकाळी पावसामुळे यंदा लिंबूच्या बागांना अपेक्षित बहार आला नाही. अर्थात, उत्पादन ५० टक्क्यांनी घटले. जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यांतील लिंबूला नाशिककडे अधिक मागणी वाढली आहे. अर्थात, या भागातून जिल्ह्यात होणारा पुरवठा नेहमीपेक्षा कमी झाल्याने लिंबूचे भाव सव्वाशे रुपये किलोवर पोहोचले आहेत. जूननंतर भाव २० ते २५ रुपये किलोवर येण्याची शक्यता आहे. लिंबूचे पाच ते सहा पटीने भाव वाढल्याने सरबत, उसाचा रस, सिकंजीचे दर प्रती ग्लास पाच रुपयांनी वाढले आहेत. पूर्वी एका ग्लाससाठी जिथे १० रुपये मोजावे लागायचे तेथे आता १५ रुपये द्यावे लागताहेत. खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर भेळ, मिसळ, पावभाजी व हॉटेलांमध्ये जेवणासोबत मिळणाऱ्या लिंबूचे प्रमाणही अतिशय नगण्य आहे. जसजसे तापमान वाढते आहे, तशी लिंबूची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात लिंबूचे भाव हे ७० ते ८० रुपये किलोवर होते.

ते यंदा सव्वाशे रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. यंदा मार्च महिन्यात झालेला वादळी व अवकाळी पावसाने लिंबू बागांचा बहर गळाला. विदर्भातून दरवर्षी होणारी आवक या वर्षी मंदावल्याने भाव वधारले आहेत.

बातम्या आणखी आहेत...