आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:महर्षी दधिची जयंतीनिमित्त कार्यक्रम

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दाधीच (दायमा ब्राह्मण) समाजातर्फे आद्यपुरुष महर्षी दधिची ऋषी यांची जयंती रविवारी महर्षी दधिची आश्रमात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने समाजाची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

बालाजीपेठेत महर्षी दधिची स्तंभाला माल्यार्पण करण्यात आले. बळीरामपेठेतील दधिमती माता मंदिरात आरती करण्यात आली. गोपाल पांडे यांचा सत्कार करण्यात आला. कन्यारत्न पुरस्कारात राहुल-ऋतुजा दायमा, आशिष-प्रियंका शर्मा व दीपक-सोनम दायमा यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांना गौरव करण्यात आला. या वेळी आमदार सुरेश भोळे, सत्यनारायण माळोदे, सुनील रतावा, सतीश दायमा, सुनील दायमा आदी उपस्थित होते.

अशी आहे कार्यकारिणी : कार्यकारिणीत नूतन अध्यक्ष राकेश पांडे, उपाध्यक्ष राहुल दायमा, कोषाध्यक्ष विनोद रतावा, सचिव दीपक दायमा, महिला अध्यक्ष भगवती दायमा, सचिव वंदना दायमा, उपाध्यक्षा अनुराधा दायमा यांची निवड करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...