आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंच्या विजयाने जळगावात आनंदोत्सव:समर्थकांचा चाैकाचाैकात जल्लाेष, फटाक्यांची आतषबाजी

जळगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा विजय झाल्यानंतर जळगावात कार्यकर्ते व समर्थकांनी रात्री आनंदाेत्सव साजरा केला. चाैकाचाैकात फटाके फाेडून व घाेषणाबाजी करत जल्लाेष करण्यात आला.

दिड वर्षापुर्वी भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या एकनाथ खडसेंना पक्षाने विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली हाेती. त्यात साेमवारी मतदान हाेऊन रात्री 10 वाजेच्या सुमारात निकाल जाहीर झाला. त्यात माजी मंत्री एकनाथ खडसे विजयी झाल्याचे जाहीर हाेताच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले हाेते.

रात्री 10 वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष रिंकू चाैधरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाजवळ फटाके फाेडले. त्यानंतर खडसे समर्थक दिलीप माहेश्वरी व सहकाऱ्यांनी रेल्वे स्टेशन चाैकात, टाॅवर चाैकात तसेच शिवाजी महाराज पुतळ्याजवळ फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच घाेषणाबाजी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस दिलीप माहेश्वरी, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वाय.एस.महाजन, माजी नगरसेवक राजू माेरे, विशाल देशमुख, राहुल पाटील, महेंद्र पाटील, नितीन माेरे, बंटी साेनवणे, प्रेम माेरे, किरण सपकाळे, विजय अहिरे, समाधान सपकाळे आदी सहभागी झाले हाेते.

बातम्या आणखी आहेत...