आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव शहर समृद्धी महामार्गाला जोडणार:सावंगीपासून कनेक्ट करण्यासाठी स्पेशल इकॉमिक कॉरीडॉरचा प्रस्ताव

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव शहर समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी स्पेशल इकॉमिक कॉरीडॉरचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. औरंगाबादजवळ सावंगी येथे समृध्दीचा नोडल पॉईंट आहे. तेथून समृध्दी महामार्ग जळगावला जोडण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

दरम्यान, शेतकऱ्यांना इतर नागरिकांना त्याचा फायदा होत असतो. गेल्या वर्षी सातबारा उताऱ्यांवरील कालबाह्य नोंदी कमी करण्याचा उपक्रम घेतला. त्याला चांगल्या पध्दतीने यश मिळाले. 36 हजाराहून अधिक कालबाह्य नोंदी कमी करु शकलो. तेवढ्या शेतकऱ्यांचे परिश्रम व संसाधने त्यामुळे वाचली.

स्पर्धा परीक्षेंच्या बाबतीत फार मोठा फरक शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असतो. त्यांना सहजासहजी मार्गदर्शन उपलब्ध असते. दर शनिवार, रविवारी त्यांना नामवंत वक्ते व यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन थेट ऐकायला मिळते. ग्रामीण भागात ही सुविधा नसते. विद्यापीठाचे कुलगुरु व्ही.एल.माहेश्वरी यांच्याशी चर्चा झाली. त्यावेळी ऑनलाईन मार्गदर्शनाची ही संकल्पना समोर आली. वक्त्यांना बोलावून भौतिक कार्यक्रम घेतला तरी दोनशे ते पाचशे युवक उपस्थित राहू शकतात.

ऑनलाइ्रन माध्यमातून हजाराहून जास्त युवक या कार्यक्रमाचा लाभ घेतात. दर शनिवारी दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम घेत असतो. त्यामध्ये यशस्वी अधिकारी, मार्गदर्शक सखोल मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांना थेट प्रश्न विचारता येतात. यू ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी प्रश्न विचारतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेची खरी परिस्थिती कळावी. शासकीय नोकरीचे ग्लॅमर बघून या क्षेत्रात येण्याचा उद्देश ठेवल्यास भ्रमनिराश होवू शकतो. परिस्थिती, काठीण्य पातळी समजावी. एकदा हे लक्षात आल्यानंतर स्मार्ट वर्क कसे करायचे, हे त्यामागचे उद्दिष्ट आहे.

शेतकरी संवेदना अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या अडचणींचे निवारण, त्यासाठी क्षेत्रीय यंत्रणांच्या पातळीवरील प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासकीय पातळीवरील अडचणी सुटू शकत नाहीत. दानशूर व्यक्ती, उद्योजकांचा गट स्थापन झालेला आहे. सीएसआरच्या माध्यमातून त्यांना मदत केली जाते. अडचणीतील शेतकऱ्यांना बियाण्यांपासून इतर प्रकारे मदत केली जात आहे. शेतकरी कुटुंबातील महिलांना झेरॉक्स मशीन, शिलाई मशीन देण्यात आलेली आहे. एक हेल्पलाईनही उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांसमोर अडचणी असतील, यंत्रणा मदतीसाठी त्यांच्या पाठीशी आहे. थकबाकीदार शेतकरी सावकाराच्या दारात जावू नयेत, त्यांना वित्तीय सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांचे समुपदेशन, व्यसनमुक्तीसाठी काम करणार आहोत,असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...