आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधान परिषद निवडणुकीत भाजपाने पंकजा मुंडे यांना डावलल्याने मुंडे समर्थक संतप्त झाले आहेत. विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच मुंडे यांना डावलल्याचा आरोप करत निषेध करण्यात आला. वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर टरबूज फोडून भाजप नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून पाच जागांकरीता उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यात भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याचे जळगावातील वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सुरूवातीला उमेदवारीसाठी नाव घ्यायचे आणि शेवटच्या क्षणी डावलण्याचा प्रकार चुकीचा आहे. वास्तविक पंकजा मुंडे यांनी 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संघर्ष यात्रा काढली होती. परंतु आता ओबीसी नको असल्यामुळेच असला प्रकार केला जात असल्याचा आरोप केला. ओबीसी समाजाला न्याय न दिल्यास भाजपला जागा दाखविण्याचा इशारा देखिल देण्यात आला. यावेळी संतप्त मुंडे समर्थकांनी महामार्गावर विरोधी पक्षनेता फडणवीस व प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे फोटो असलेल्या फलकासमोर टरबूज फोडून आपली नाराजी व्यक्त केली. तसेच भाजप व नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. जळगावातील वंजारी समाजाचे कार्यकर्ते ईश्वर पाटील, अनिल घुगे, गजानन वंजारी, रितेश लाडवंजारी, योगेश नाईक, राहुल सानप, शेखर लाडवंजारी, महेश घुगे, तेजस वाघ, विशाल घुगे, अभिजीत घुगे, गौरव वाघ, किरण नाईक, वैभव वाघ, ऋषिकेश वाघ, आकाश पाटील, मयुर पाटील, नरेंद्र नाईक आदींनी आंदोलनात सहभाग घेतला
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.