आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंधनाच्या दरात सतत वाढ होत आहे. त्याचा परिणाम सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या व वाहतूक, प्रवास भाड्यात वाढ झाली आहे. या विरोधात भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशच्या सूचनेनुसार जळगाव जिल्हा शाखेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.
मध्यमवर्गीयांचे प्रचंड हाल : इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय समाजाचे प्रचंड हाल होत असून जगणे मुश्कील होत आहे. राज्य सरकारने वाढवलेल्या करांमुळे डिझेल, पेट्रोल दर दिवशी वाढत आहे. केंद्र व राज्य सरकार यांच्यात सुरु असलेल्या हेव्यादाव्यांमुळे जनतेला त्याची झळ सोसावी लागत आहे. या विरोधात ही निदर्शने करण्यात आली. यात वीज उद्योग, संरक्षण उद्योग, बँक, नगरपालिका, महापालिका, ग्रामपंचायत, बांधकाम, मच्छिमार, संघटित, असंघटित शेतमजूर अादी क्षेत्रातील कार्यकर्ते, सभासद सहभागी झाले होते.
जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन : आंदोलनाचे नेतृत्व सुरेश सोनार, दिलीप पाटील, सचिन लाडवंजारी यांनी केले. यावेळी किरण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, कैलास रोकडे, सदाशिव सोनार, महेंद्र सैतवाल, विकास चौधरी, बी.बी. सपकाळे, हरी वालकर, कमलेश सोनवणे व पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांना पोहचविण्यासाठीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.