आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये स्थूलपणा दुपटीने वाढला आहे. स्थूलपणामुळे विविध आजार शरीराला जडतात. लहान मुलांना स्थूलपणा होणार नाही, याबाबत मुलांना जर माहिती आताच दिली, काळजी घेतली तर भविष्यात मुलांमध्ये स्थूलता वाढणार नाही. हा स्थूलपणा घालवण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने सुरू केलेले अभियान राज्यभरात महत्त्वाची भूमिका बजावेल. व्यायाम व आहार यावर आपले वजन अवलंबून आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या स्थूलपणा जनजागृती व उपचार अभियानास शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथून प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जनजागृती अभियानाचे फलक हाती घेऊन मान्यवरांनी अभियानाला सुरुवात केली. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी केले. डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संगीता गावित यांनी आभार मानले.
महाजनांनी सांगितले निरोगी आयुष्याचे रहस्य
मंत्री महाजन हे निरोगी असल्याने नेहमी त्यांची स्तुती होत असते. कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या निरोगी जीवनाचे रहस्य सांगितले. आयुष्यभर मी चहाला शिवलेलाही नाही. तेलकट-तुपकट पदार्थ, फास्ट फूड, साखर मी टाळतो. पूर्णपणे निर्व्यसनी आहे. दररोज सकाळी एक तास व्यायाम करीत असून जिममध्ये जात असल्याचेही महाजन म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.