आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा:राज्यात तीर्थक्षेत्र विकासासाठी 2 हजार‎ कोटींची तरतूद, मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे वैभव वाढवणार‎-  मंत्री महाजन

प्रतिनिधी | जळगाव / जामनेर‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अ आणि ब दर्जाच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी प्रत्येकी पाच कोटींचा निधी देणार‎

महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांच्या ‎विकासासाठी शासनातर्फे दोन हजार‎ कोटींची तरतूद करण्यात आल्याची‎ माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश‎ महाजन यांनी शनिवारी जामनेरात‎ दिली. अ आणि ब दर्जाच्या तीर्थक्षेत्र‎ विकासासाठी प्रत्येकी पाच कोटी‎ रुपयांचा निधी देणार असल्याचेही‎ मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.‎

श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर‎ समितीतर्फे काढण्यात आलेल्या‎ पांडुरंगराय पालखी सोहळ्याच्या‎ स्वागताप्रसंगी मंत्री महाजन बोलत‎ होते. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.‎ या राज्यातील तीर्थक्षेत्र सर्व‎ सोयींनी-युक्त करण्याच्या दृष्टीने‎ शासन प्रयत्नशील आहे. प्रत्येक‎ तीर्थक्षेत्राच्या ५ कोटी रुपयांचा निधी‎ देण्याचे शासनाचे धोरण‎ असल्याचेही या वेळी मंत्री महाजन‎ यांनी नमूद केले. पंढरपूर येथून‎ शुक्रवारी मुक्ताईनगर जाण्यासाठी‎ पांडुरंगराय पालखी निघाली. या‎ पालखीचे शनिवारी जामनेरात‎ आगमन झाले. संत मुक्ताई अंतर्धान‎ समाधी सोहळ्यासाठी मुक्ताईनगर‎कडे जाणाऱ्या या पालखीचे‎ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन‎ यांनी जामनेरात स्वागत केले. या‎ वेळी पादुकांचे दर्शन घेऊन मनोगत‎ व्यक्त करताना मंत्री महाजन यांनी‎ राज्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी २‎ हजार कोटींचा निधी ठेवण्यात‎ आला असल्याची माहिती दिली.‎ पालखी सोहळा प्रमुख मेघराज‎ वळखे पाटील यांच्या हस्ते श्रीफळ‎ देऊन मंत्री महाजन यांचा सन्मान‎ करण्यात आला. या वेळी मंत्री‎ महाजन यांनी भक्तांमध्ये बसून संत‎ वचन श्रवण केले. या प्रसंगी संत‎ मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख‎ रवींद्र महाराज हरणे, भागवत धर्म‎ प्रसारक समितीचे अध्यक्ष सूर्यकांत‎ भिसे, अमोल महाराज पाटील, शरद‎ पाटील, उल्हास पाटील, दीपक‎ तायडे व मान्यवर उपस्थित होते.‎

संत मुक्ताबाई पालखी सोहळा ३४‎ दिवसांचा होता, तो आता २४‎ दिवसांचा केला आहे. संत ज्ञानेश्वर,‎ संत तुकाराम महाराज पालखी‎ सोहळ्याप्रमाणे मुक्ताईच्या पालखी‎ सोहळ्यालाही सर्व सुविधा व‎ शासकीय मदत मिळावी, अशी‎ मागणी रवींद्र हरणे महाराज यांनी‎ केली. संत मुक्ताबाई तीर्थक्षेत्र हे सर्व‎ सोयींयुक्त करण्याचे काम सध्या‎ सुरू आहे. या कामासाठी आपण‎ सर्वतोपरी मदत करू, असे सांगून‎ पालखी सोहळ्याचे वैभव‎ वाढवण्यासाठी ही मदत करण्याची‎ ग्वाही मंत्री महाजन यांनी दिली.‎