आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव पंचायत समितीच्या १० गणांसाठी गुरुवारी पंचायत समिती कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. महिलांसाठी पाच जागा आरक्षित झाल्या आहेत. दहापैकी बहुतांश गणात प्रस्थापितांना कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारीची संधी मिळणार आहे. तर काहींचे आरक्षण बदलल्याने त्यांची संधी हुकणार आहे. आरक्षणावर मंगळवारपर्यंत हरकत घेता येणार आहे.
दोन गणांच्या आरक्षणासाठी ईश्वरचिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. जनरलसाठी भोकर, कानळदा, ममुराबाद, म्हसावद, बोरनार या पाच गणांचे आरक्षण निघाले. त्यातील तीन महिला राखीव आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि एसटी (महिला) प्रवर्गाच्या आरक्षणासाठी (महिला) ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. कानळदा, शिरसोली प्र. न. आणि बोरनार यापैकी शिरसोली प्र. न. गण सोडतीद्वारे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाला. यानंतर महिला आरक्षणाची प्रक्रिया झाली. जिल्हा परिषद विद्यानिकेतनचा विद्यार्थी सौरव चिंचाळे याने ही चिठ्ठी काढली.
भादली बुद्रुक अनुसूचित जमाती महिला राखीव
आसोदा गणासाठी पहिल्यांदाच अनुसूचित जाती महिला राखीव आरक्षण निघाले. भादली बुद्रुक गण एसटी महिलांसाठी राखीव आहे. नशिराबाद वगळल्याने कुसुंबा खुर्द गटात पुन्हा अनुसूचित जाती संवर्गाचे आरक्षण निघाले. कानळदा गणासह शिरसोली प्र.न., ममुराबाद, बोरनार गणात प्रस्थापितांना महिला जागेवर कुटुंबातील व्यक्तीस उमेदवारीची संधी मिळणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.