आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखून, खंडणी या सारख्या गंभीर गुन्ह्यात संशयित असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून एक लाख रुपयांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी रंगहात बेड्या ठोकल्या. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलिस ठाण्यात ही कारवाई करून पोलिस उपनिरीक्षक योगेश जगन्नाथ ढिकले (वय 32, रा. जिजाईनगर, मेहुणबारे) याला अटक करण्यात आली.
नेमके प्रकरण काय?
मेहुणबारे येथील २७ वर्षीय तरुणावर गेल्या वर्षी खूनाचा गुन्हा दाखल आहे. यासह खंडणी, जबरी लूट, प्राणघातक हल्ला या सारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात लवकर पाठवण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी उपनिरीक्षक ढिकले याने गुरुवारी सकाळी तक्रारदाराकडून साडेचार लाख रुपयांची लाच मागितली. ऐवढे पैसे देऊ शकत नसल्याने तक्रारदाराने तडजोड करुन एक लाख रुपये देण्यास सांगितले. दरम्यान, यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करून सापळा रचला. त्यानुसार पथकाने दुपारी ढिकले याचा एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. त्याच्या विरुद्ध मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.