आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकारी:प्रत्येक शाळांमध्ये नियुक्त होणार जन माहिती अधिकारी ; आता मुख्याध्यापक प्रथम अपिलीय अधिकारी

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राईट टू इन्फॉमेशन (आरटीआय) अंतर्गत मागवलेली माहिती अर्जदारास देण्यासाठी आता प्रत्येक शाळांवर जन माहिती अधिकारी नियुक्त करण्यात आले असून त्याच शाळेतील मुख्याध्यापक हे अपिलीय अधिकारी असणार आहेत. यासंबधीचे आदेश शिक्षण संचालक महेश पालकर यांनी काढले आहेत. या निर्णयामुळे आता माहिती अधिकारावरील सुनावणीच्या कामातून प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाची मुक्तता झाली असून ताणही दूर होणार आहे. माहिती अधिकाऱ्यांच्या अंतर्गत विविध खाजगी शाळांमधील विविध माहिती मागवण्यासाठी या आधी मुख्याध्यापक जन माहिती अधिकारी होते. त्यांच्याकडून ही माहिती मिळत नसल्याने शिक्षण विभागाकडे याबाबत तक्रारी वाढत होत्या. या तक्रारींच्या सुनावण्याही विभागास घ्याव्या लागत होत्या. यात अधिक वेळ खर्ची होत होता. त्यामुळे आता जिल्ह्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या प्रत्येक शाळांमध्ये आरटीआय अंतर्गत हा बदल केला आहे. या बदलामुळे अपिलकर्ता, तक्रारकर्ता यांना वेळेत माहिती मिळणे सोईचे होईल, असा आशावादही राज्य शिक्षण विभागाला आहे. या अंतर्गत सर्व माध्यमिक शाळांतील वरिष्ठ शिक्षक यांना जन माहिती अधिकारी व मुख्याध्यापक अथवा प्राचार्य यांना प्रथम अपिलीय अधिकारी नियुक्त करावे लागणार आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील एका वरिष्ठ शिक्षकाची नियुक्ती जन माहिती अधिकारी तर एक सहाय्यक जन माहिती अधिकारी म्हणून करावयाची आहे. या संबधीची माहिती शाळेच्या दर्शनी भागात प्रदर्शित करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. तक्रारदारास या जन माहिती व अपिलीय अधिकारी यांच्याकडून समाधानकारक माहिती न मिळाल्यास त्यांना नाशिक राज्य माहिती आयुक्तांकडे दाद मागता येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...