आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनसंपर्क विभागातील अर्जाची संधी संपली:मुदतवाढीसाठी अजुनही मागणी; पत्रकारितेची पदवी नमूद केले असतानाही स्विकारले नाही अर्ज

जळगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहिती व जनसंपर्क विभागातील भरतीचे अर्ज दाखल करण्याची मुदत 23 जानेवारी रोजी संपली आहे. तरी देखील राजकीय पदाधिकाऱ्यांकडून अजुनही मुदतवाढीची मागणी केली जाते आहे. तांत्रिक अडचणीमुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना या संधीपासून मुकावे लागणार आहे. जळगाव, धुळे व नंदुरबारमधील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांची संधी हुकणार आहे.

या संदर्भात सर्वात आधी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ‎ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व‎ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे‎ मागणी केली. यांनतर 23 रोजी भाजपचे प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी देखील हीच मागणी केली आहे. सुमारे दहा वर्षांनंतर या विभागात मेगा भरती केली जाते आहे. अनेक वर्षांपासून पत्रकारितेचे शिक्षण घेउन कार्य करणाऱ्या पत्रकारांसाठी मोठी संधी आहे. आयोगाच्या जाहिरातीमध्ये स्पष्टपणे पत्रकारितेतील पदवी नमूद केले असतानाही उमेदवार जेव्हा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जातो तेव्हा त्याला ‘आपल्याकडे संबंधित पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता नसल्याने अर्ज करण्यास पात्र नाहीत', असा संदेश पुढे येतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही तांत्रिक त्रुटी असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र ही त्रुटी दूर करण्यासाठी कुठलीही कार्यवाही मात्र करण्यात आली नाही. पत्रकारितेतील पदविका असलेल्यांचे अर्ज संकेतस्थळावरून स्वीकारण्यात येत आहेत. मात्र याउपर पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवी असलेल्यांना या पदांसाठी अपात्र ठरविण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीमध्ये नमूद अनुभव आणि शैक्षणिक अहर्ता असूनही केवळ आयोगाच्या तांत्रिक त्रुटीमुळे अनेक विद्यार्थी या पदभरतीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे सदर विषयात जातीने लक्ष घालून संपूर्ण पदभरती पारदर्शी पद्धतीने व्हावी यासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांची प्रयत्न सुरू केले आहे. परंतु, आता अर्ज करण्याची मुदत संपली असून आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर मुदतवाढीच्या संदर्भात अपडेट आलेले नाही.

खासगी संस्थांच्या डिप्लोमाचे अर्ज स्विकारले

दरम्यान, आयोगाच्या संकेतस्थळावर ऑॅनलाईन फॉर्म भरत असताना काही उमेदवारांनी खासगी संस्थांमधून पदविकाचे (डिप्लोमा) शिक्षण पुर्ण केले आहेत त्यांचे अर्ज स्विकारले जात आहेत. यातील अनेक संस्था आता बंद देखील पडल्या आहेत. पण शासनमान्य विद्यापीठांमधून पदवीत्तुर पदवी धारक उमेदवारांचे अर्ज स्विकारले जात नसल्यामुळे उमेदवारांकडून नाराजी व्यक्त केली जाते आहे.

उत्तर महाराष्ट्रातून सुमारे हजार मुलांना संधी हुकणार

दरम्यान, गेल्या दहा वर्षात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमधून जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांतून सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी पदव्यत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी निर्माण झाली होती. परंतु, तांत्रिक त्रुटींमध्ये आता हिरावली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...