आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्याचा सुवर्णकाळ:‘पुल’ यांच्या जयंतीनिमित्त माय एफएमतर्फे पुलवणूक सीजन 2

जळगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पु. ल. देशपांडे हे नाव मराठी साहित्याचा सुवर्णकाळ दर्शवणारे आहे. ‘पुलं’ हे नावच मराठी माणसाच्या चेहऱ्यावर स्मित आणण्यासाठी पुरेसे आहे. व्यक्तिरेखा, नाटक, चित्रपट, कथा, प्रवासवर्णन, प्रसंग वर्णनासोबतच उत्तम वक्ते, संगीतकार अशा अनेक गुणांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व सजले आहे. अशा वल्लीच्या १०३व्या जयंतीनिमित्त मायएफएम पुलवणूक सीजन-२ हा पर्वणी कार्यक्रम घेऊन येत आहे. पलवणूक कार्यक्रमांतर्गत ८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान मायएफएम ‘पुलं’च्या कथांमधली काही क्षणचित्रांसह अभिजित खांडकेकर, सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, संदीप पाठक, अधोक्षज कऱ्हाडे, संकर्षण कऱ्हाडे या कलाकारांच्या नजरेतले पुलं सजवणार आहे. यात ‘पुलं’बद्दलच्या त्यांच्या आठवणी ऐकवण्यात येणार आहे. तसेच पुलंना माय एफएमच्या आरजेच्या पेजेस वर देखील पाहता येणार आहे. या निमित्ताने पुलंचे खास ग्रंथ प्रदर्शन नेवे बुकला भरवण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...