आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करंडक स्पर्धा:पुरुषोत्तम करंडक स्पर्धा, वेळापत्रक केले जाहीर

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मू.जे. महाविद्यालय व महाराष्ट्रीय कलोपासक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. १०, ११ ऑक्टोबरला छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात एकूण १३ एकांकिकेचे सादरीकरण हाेणार आहे. रविवारी या एकांकिकेचे वेळापत्रक अर्थात लोट्स पाडण्यात आले.स्पर्धेत पहिल्या दिवशी ६ व दुसऱ्या दिवशी ७ एकांकिका अशा एकूण १३ एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे.

यांचा राहणार सहभाग
१० रोजी डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय, गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी, मू. जे. महाविद्यालय (जळगाव), पु. ओ. नाहाटा महाविद्यालय, कोटेचा महिला महाविद्यालय (भुसावळ). ११ रोजी एम. जी. महाविद्यालय (चोपडा), जयहिंद महाविद्यालय (धुळे), पं. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय (धुळे), प्रताप महाविद्यालय (धुळे), देवगिरी महाविद्यालय व शासकीय अभियांत्रिकी (औरंगाबाद).

बातम्या आणखी आहेत...