आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका व्यवसायिकाच्या कंपनीच्या कार्यालयात जबदरस्तीने शिरुन लॅपटॉप, प्रिन्टर, सोन्याचे शिक्के, कोरे धनादेश असे साहित्य आणि रोकड असा एकूण 1 लाख 14 हजार रुपयांचा ऐवज दरोडा टाकून लांबवला. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी विनोद देशमुख यांच्यासह 11 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज लिलाधर वाणी (वय 40, रा. जिल्हा परिषद कॉलनी, जळगाव) यांच्या कार्यालयात ही घटना घडली आहे. वाणी यांचे रामदास कॉलनी येथे मनोकल्प ट्रेडींग अॅण्ड सर्व्हीसेस, मनोकल्प प्रतिष्ठान आहे. हे ऑफिस तळ मजल्यावरील 4 खोल्या सन 2016 पासून घनश्याम लक्ष्मण पाटील यांच्याकडून भाड्याने करारनामा करुन घेतली आहे. घनश्याम पाटील हे मृत झाल्यामुळे त्यांचा मुलगा राजेश यांच्या नावे झाली आहे. ती जागा भाडेकरू म्हणून वाणी यांच्या ताब्यात आहे. सन 2018 मध्ये मनोज वाणी आणि त्यांच्या पत्नी कल्पना वाणी यांनी गोदावरी लक्ष्मी को ऑप बँक लि. जळगाव या बँकेकडून दोन कोटी रुपये कर्ज घेतले. त्यासाठी राजेश पाटील यांनी रजिष्टर गहाणखत करुन दिले आहे. याचा गाळ्यांमध्ये वाणी यांचे कार्यालय असून तेथे कंपनीचे मुळ रेकॉर्ड, दस्तऐवज, संगणक, कंपनीचा लॅपटॉप, तसेच पुजेसाठी सोन्याचे व चांदीचे शिक्के व व्यवहारासाठी लागणारी रोख रक्कम, डायनिंग टेबल, खूर्चा, दोन कपाट त्या ठिकाणी ठेवलेले होते. कार्यालयात प्रदीप बारी शिपाई म्हणून काम करतात. कोरोना काळात वाणी यांच्याकडून कर्जाची नियमीत परतफेड झाली नाही.
बँकेशी तडजोडीअंती गाळे वाणी यांच्यासह सहा जणांना भाडेतत्त्वाने देण्यात आले आहे. 31 ऑक्टोबर रोजी दुपारी त्यांच्या कार्यालयात जितेंद्र उर्फ रवी बाबुराव देशमुख, विनोद पंजाबराव देशमुख, जगदीश पुंडलिक पाटील, मिलींद नारायण सोनवणे, रितेश देवराम पाटील, कैलास पाटील, एक महिला व इतर एक अनोळखी महिला व तीन ते चार अनोळखी व्यक्ती असे दोन कारने आले. त्यांनी शिपाई प्रदीप बारी यांना धमकावून बळजबरीने कार्यालयात प्रवेश केला. बारी याने वाणी यांना मोबाईलवर फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. यानंतर मनोज वाणी हे लागलीच कार्यालयात पोहोचले होते. यावेळी देशमुख यांच्यासह जमावाने कार्यालयातून मुळ रेकॉर्ड, मौल्यवान दस्तऐवज, संगणक, एचपी कंपनीचा लॅपटॉप, तसेच पूजेच्या सोन्याचे 3 ग्रॅमचे 3 शिक्के व 120 ग्रॅम एकूण वजनाचे चांदीचे 6 शिक्के व 12 हजार 500 रुपये रोख, सह्या केलेले धनादेशर, स्टॅम्प पेपर असा 1 लाख 14 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकाऊन नेला. वाणी यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिवीगाळे करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.