आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात मुस्लिम कट्टरवाद वाढल्याचा आरोप करून त्या विरोधात विरोधात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. भडकावू भाषण देणारे तसेच देशातील मुस्लिम कट्टरवादी संघटनांवर तत्काळ बंदी घालण्याची मागणी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
देशातील वाढत्या इस्लामी जिहादी कट्टरता आणि हिंसाचाराच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, देशात जिहादी कट्टरवाद ही भूमिका घेऊन कट कारस्थान केले जात आहे. देशातील शांतता भंग करण्याचे काम केले जात आहे. हे प्रकार ताबडतोब थांबावे व योग्य ती कार्यवाही व्हावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रामरक्षा व हनुमान चालीसा म्हणून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. नुकतेच नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्या वक्तव्यावरुन गेल्या दोन शुक्रवारी नमाजानंतर मशिदींमधून हल्ले करण्यात आले. घरे जाळण्यात आली. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. लोकशाही धोक्यात आल्याचा गवगवा करणारे अनेक राजकीय पक्ष मौन बाळगून आहेत. नमाजनंतर मशिदीतून बाहेर पडलेल्या जमावाची आणि दंगलखोरांची ओळख पटवण्यात यावी. त्यांच्यावर रासुका अंतर्गत कारवाई करण्यात यावी. मौलवींना भाषण देण्यापासून थांबवावे. देशभरात भडकाऊ भाषणे देणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. इस्लामिक जिहादी धर्मांधता पसरवून देशात हिंसाचार पसरवणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि तबलिकी जमात या सारख्या कट्टरवादी संघटनांवर तत्काळ बंदी आणण्यात यावी. ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्याक झाले आहेत.तेथे सुरक्षेची व्यवस्था करण्यात यावी. पोलिस चौकी स्थापन करण्यात यावी आदी मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या.
आंदोलनात विहींपचे देवगिरी प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे, प्रांत सहमंत्री ललित चौधरी, जिल्हामंत्री देवेद्र भावसार , ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, बजरंग दल विभाग संयोजक राकेश लोहार, जिल्हा संयोजक राजेश नन्नवरे आमदार सुरेश भोळे, प्रांत उपाध्यक्ष धनंजय तिवारी, महानगर मंत्री मनोज बाविस्कर, संयोजक समाधान पाटील, हरीष कोल्हे, विशाल जगदाळे, भरत कोळी व रा. स्व. संघाचे राजेश ज्ञाने , योगेश इंगळे, समीर साने, समीर चौधरी, सागर ऊपाध्ये तसेच विहिंप, बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.