आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रेल्वे, ट्रॅव्हल्स, एसटी कॅश करणार दिवाळी सीझन, तर एसटी बसेसची कमतरता

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीच्या सुटीत पुण्या-मुंबईहून चाकरमाने, विद्यार्थी व व्यावसायिक मोठ्या प्रमाणात गावी येतात. त्यामुळे २१ ऑक्टोबरपासून गावी येणाऱ्यांचे प्रमाण वाढणार आहे. तर दिवाळीनंतर २७ ऑक्टोबरनंतर परतीचे सीझन सुरू होईल. त्यामुळे रेल्वे, ट्रॅव्हल व राज्य परिवहनच्या बस ह्या हे सीझन कॅश करण्यासाठी सरसावले आहेत. दरवर्षी पुणे-मुंबईकडून येणारे प्रवासी हे सर्वात आधी रेल्वेला प्राधान्य देतात. रेल्वेचे तिकीट कन्फर्म नसेल तर हे प्रवासी ट्रॅव्हल्सकडे वळतात. तर सर्वसाधारण प्रवाशांची मदार मात्र, अजूनही एसटीवरच आहे.

दिवाळीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वे फेस्टिव्हल सीझनसाठी अतिरिक्त गाड्यांमध्ये वाढ केली असली तरी पुणेकडून येणाऱ्या आझाद हिंद, झेलम, महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाड्यांना २४पर्यंत तर मुंबईकडून येणाऱ्या दादर-अमृतसर, पाटलीपुत्र, कुशीनगर, काशी व गीतांजली या गाड्यांना २६ ऑक्टोबरपर्यंत नो-रूम आहे. एसटी महामंडळाने कोरोनापूर्वी दिवाळी सीझनमध्ये १० टक्के भाडे वाढ केली होती; मात्र, यंदा अजून त्यावर कोणाताही निर्णय झालेला नाही. टॅव्हल्सचालक दिवाळी सीझन काळात एसी-नॉन एसी गाड्यांना २१०० ते २२०० भाडे अपेक्षित असल्याचे खासगी ट्रॅव्हल्स चालकांचे मत आहे.

ट्रॅव्हल्स भाडे वाढ फेस्टिव्हल सीझन पुरतीच
दिवाळीच्या सणात पुणे, मुंबईहून येणाऱ्यांचे अधिक असते. त्यामुळे दिवाळीपूर्वी येणाऱ्यांचा तिकीट दर अधिक असतो. तर दिवाळीनंतर जाण्याचा दर अधिक असतो. ट्रॅव्हलचालकांना हा दर शासकीय दरापेक्षा दीड पटीने अधिक घेता येतो. दिवाळीच्या सीजन असला तरी अनेकदा ट्रॅव्हल ह्या एका बाजून खाली येतात. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यातच डिझेल दर वाढ, कर्मचाऱ्यांचे पगार आदी नुकसान भरून काढण्यासाठी भाडेवाढ अटळ असल्याचे ट्रॅव्हल चालकांचे मत आहे.

कोरोनानंतरची संधी
कोरोनानंतर दोन वर्षांनी यंदाची दिवाळी निर्बंधमुक्त वातावरणात साजरी केली जाणार आहे. त्यामुळे दळणवळण क्षेत्राला नवी उभारी घेण्याची संघी या काळात मिळणार आहे.

राज्य परिवहन मंडळाकडून आगाऊ आरक्षण
पुणे-मुंबईकडून दिवाळीत अनेक नोकरदार, विद्यार्थी, कंपनीतील कर्मचारी गावी येतात. त्यामुळे एसटीतर्फे दिवाळी सीजन कॅश करण्यासाठी आतापासूनच आगाऊ आरक्षणावर भर दिला जात आहे. तर २७ ऑक्टोबरपासून हे कर्मचारी परतीच्या प्रवास करणार आहेत. त्यामुळे या प्रवाशांना जाण्या-येण्याचेही आरक्षण करता येईल. तसेच प्रवाशांना मोबाइल अॅपद्वारेदेखील ऑनलाइन आरक्षण प्रवाशांना करता येणार आहे.
दिलीप बंजार, वाहतूक अधीक्षक

बातम्या आणखी आहेत...