आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएसटी वर्कशॉपच्या स्क्रॅप युनिटमध्ये रविवारी दुपारी सव्वातीन वाजेदरम्यान आग लागली. ही आग भर पावसात लागल्याने तसेच महापालिकेचे दोन बंब लगेच उपस्थित झाल्याने अनर्थ टळला. आगीचे कारण अस्पष्ट आहे.
एसटी वर्कशॉपच्या स्क्रॅप युनिटला दुपारी सव्वातीन वाजता आग लागली. वर्कशॉपच्या भंगार युनिटमधून धूर येत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांचे लक्षात आले. आगीची माहिती कळताच आग विझवण्यासाठी महापालिकेचे दोन बंब उपस्थित झाले. याच दरम्यान, पावसाला सुरुवात झाल्याने आग पसरण्यास अडथळा आला. स्क्रॅप युनिटलगत वीज वाहिनी नसल्याने आग लागण्यास शॉर्टसर्किटचे कारण नाही. या स्क्रॅप युनिटलगत एसटीची जुनी वसाहत आहे. पाऊस नसता तर आग पसरून मोठी हानी झाली असती. मात्र, वेळीच आग आटोक्यात आल्याने सुदैवाने अनर्थ टळला.
पाऊस नसता तर झाली असती हानी
एसटीच्या स्क्रॅप युनिटमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार पसरले आहे. यात एसटीचे विविध पार्ट, बसेसचा सांगाडा, सीट, रबर आदी साहित्य आहे. तसेच येथे वाळलेले गवत, झाडाच्या फांद्या व या युनिटलगतच भिंतीपलीकडे एसटी कर्मचाऱ्यांची जुनी वसाहतही असल्याने पाऊस नसता तर मोठी हानी झाली असती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.