आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेला दूषणे देत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ४२ काेटींची रस्त्याची कामे साेपवण्यात आली. कामे सुरू हाेऊन चार महिने उलटले तरी एकाही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. सर्वच रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. त्यातच हवामान खात्याने येत्या चार दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कारपेट न केलेल्या रस्त्यांवर पाऊस झाल्यास अर्धवट बनलेल्या रस्त्यांची वाट लागण्याचा धोका समोर दिसतो आहे. शहरातील काेर्ट ते गणेश काॅलनी रस्ता आणिआयएमआरकडून रिंगराेडकडे जाणारा रस्ता यांची तुलना केली जाते आहे. त्यामुळे ४२ काेटींतील रस्ते गुळगुळीत केव्हा हाेणार, असा प्रश्न नागरिकांकडून मनपाच्या अधिकारी वलाेकप्रतिनिधींना विचारला जातो आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मात्र मक्तेदाराची पाठराखण केली जात असल्याचे समोर येते आहे.
कारपेट एकाच वेळी करण्यासाठी आतापर्यंत ठेकेदाराने २३ रस्त्यांचे काम केले असून ३१ रस्त्यांचे बीएम झाल्यावर कारपेट करण्याचे नियाेजन असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. अर्थात, असे करण्याचे काही कारण नाही. रस्त्यांच्या कामानुसार वेळच्या वेळी त्यावर कारपेट होणे आवश्यक आहे. ते होत नसल्यामुळे रस्ते नव्याने करण्यात आल्याची अनुभूतीच येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. तीन महिन्यात २३ रस्त्यांचे डांबरीकरण : ४२ काेटींच्या निधीतून मंजूर ४९ रस्त्यांपैकी आतापर्यंत तीन महिन्यात २३ रस्त्यांचे डांबरीकरण (बीएम) पूर्ण झाले आहे. चार रस्त्यांचे एमपीएमचे काम पूर्ण झाले असून बीएम सुरू आहे. तीन रस्त्यांचे एमपीएमचे काम सुरू आहे. त्यामुळे आणखी आठ रस्त्यांचे बीएमचे काम पूर्ण करण्यासाठी २० दिवसांचा कालावधी लागणार आहे.
कारपेट न केल्याने रस्त्यांवर खड्डे
४२ काेटींच्या निधीतून सगळ्यात आधी नाेव्हेंबर महिन्यात काेर्ट ते गणेश काॅलनी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले हाेते. एमपीएम आणि बीएमचे काम आटाेपून चार महिने उलटले आहेत; परंतु त्यावर अद्याप कारपेटचा थर टाकलेला नाही. परिणामी अनेक ठिकाणी सध्या खडी निघायला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी तर खड्डे पडले आहे. हीच स्थिती शहरामध्ये ज्या ठिकाणी बीएमचे काम करण्यात आली आहे त्या ठिकाणची आहे.
दहा दिवसांत कारपेटचे काम अपेक्षित
रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामासाठी काही विशिष्ट कालावधीत ते पूर्ण हाेणे अपेक्षित असते. एमपीएम व बीएम (बिट्युमीन मेकाडम) यात आठ दिवसांचे अंतर असणे अपेक्षित आहे. बीएम झाल्यावर १० ते २० दिवसांनी कारपेट व त्यानंतर सीलकाेटसाठी डांबराचा स्प्रे मारणे अपेक्षित असते. बीएम हा सुपेरीअर लेअर असेल तर महिना ते दीड महिन्यात कारपेट करता येते; परंतु जर बीएम केल्यानंतर खडी निघणे, खड्डे पडत असतील तर दहा दिवसांत कारपेटचे काम करणे अपेक्षित असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.