आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरणात उकाडा:दुसऱ्या दिवशीही पाऊस; तापमान 21 अंशांवर

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात वातावरणात ढगांची चादर आेढलेली आहे. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी जामनेर तालुक्यात मुसळधार पावसाने जाेरदार हजेरी लावली. तर जळगाव शहरातील काही उपनगरांमध्ये पावसाच्या तुरळक सरी काेसळल्या. ढगाळ वातावरणामुळे गेल्या तीन दिवसांपासून रात्रीचे किमान तापमान प्रथमच २१ अंश सेल्सिअवर स्थिरावले आहे. त्यामुळे वातावरणात उकाडा वाढला आहे.

मंगळवारी जामनेरसह काही भागात पाऊस झाला. बुधवारी दुपारी ४ ते ५ या वेळेत फर्दापूर, ताेंडापूर, वाकाेद, वाकडी या परिसरात जाेरदार पावसाने हजेरी लावली. रात्री जळगाव शहराला लागून असलेल्या तरसाेद, नशिराबाद परिसरात पाऊस झाला. बुधवारी पहाटे बंभाेरी, खाेटेनगर या भागात पावसाच्या तुरळक सरी काेसळल्या. दरम्यान, ढगाळ वातावरणात ७० ते ८० टक्के आकाश ढगाच्छादित आहे. दृश्यमानताही कमी झालेली आहे. बुधवारी २१.७ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस नाेंदवले गेले.

दाेन दिवस ढगाळ स्थिती
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार १५ डिसेंबर राेजी जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस हाेण्याची शक्यता आहे. १६ डिसेंबर राेजी वातावरण काहीसे ढगाळ असेल. त्यानंतर मात्र ढगाळ वातावरण निवळून पुन्हा थंडी वाढेल.

बातम्या आणखी आहेत...