आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडित:पावसाचे वातावरण; तळेगावसह परिसरात 18 तास वीजपुरवठा खंडित

तळेगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाचे वातावरण तयार झाल्याने परिसरात तब्बल १८ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर पाऊस पडल्यावर किती वेळ वीजपुरवठा खंडित होईल, याचा अंदाज घेणे कठीण झाले आहे.

यावर्षी वीज वितरण कंपनीने कुठल्याही प्रकारची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती व देखभाल केली नसल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे मात्र परिसरात वीज वितरणबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. रात्री दोन वाजता स्थानिक कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन विजेचा झालेला बिघाड शोधला. तरीही वीज सुरळीत व्हायला तब्बल ११ तास लागले.

वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी कर्मचाऱ्यांना वृक्षतोड व इतर दुरुस्ती व देखभालीच्या कामासंदर्भात सूचना करायला हव्यात. नाहीतर पावसाळ्यात अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होऊन त्याचा परिणाम पाणीपुरवठा व इतर सेवांवर ही होईल. पावसाळ्यापूर्वी ही कामे वीज वितरणने पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...