आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएचआर पतसंस्था प्रकरण:खोट्या करारनाम्यामुळे रायसोनीला सक्तमजुरी, 25 लाख दंडाची शिक्षा

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चाळीसगाव शहरातील शाखेचे कार्यालय असलेले चार गाळे स्वत:च्या नावावर नसतानाही खोटा करारनामा तयार करून या गाळ्यांपोटी २५ लाख रुपये डिपॉझिट व दरमहा पाच हजार रुपये उकळल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात बीएचआरचा संस्थापक प्रमोद रायसोनी तसेच आणखी एकास न्यायालयाने शिक्षा ठाेठावली. प्रमोद भाईचंद रायसोनी (६१, रा. बळीराम पेठ) याला साडेतीन वर्षे सश्रम कारावास व २५ लाख रुपये दंड, दंड न भरल्यास २१ महिन्यांची साधी कैद, तर तत्कालीन मुख्य व्यवस्थापक सुकलाल शहादू माळी (५२, रा. तळेगाव, ता. जामनेर) याला साडेतीन वर्षे कारावास व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

बीएचआरचे चाळीसगाव शहरात मेजर कॉर्नर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील चार गाळ्यांमध्ये शाखा आहेत. ही दुकाने स्वत:च्या नावावर नसताना प्रमोद रायसोनी व त्याची पत्नी कल्पना यांनी ८ फेब्रुवारी २००६ रोजी मुख्य व्यवस्थापक माळी याच्या मदतीने खोटे करारनामे तयार केले होते.

बातम्या आणखी आहेत...