आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधार्मिकस्थळावरील भोंग्यांचा विषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी सडकून टीका केली. भोंग्यांचा प्रश्नापेक्षा महिला, दलितांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत जागृती करण्याचे अवाहन प्रा.कवाडे यांनी केले.
रिपब्लिकन पक्षातर्फे भुसावळ येथे आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी प्रा. कवाडे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. प्रा.कवाडे यांनी अजिंठा या शासकीय विश्रामगृहात संवाद साधला. यावेळी त्यांनी किमान राज यांनी त्यांचे अजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार तरी अभ्यासण्याचा सल्लाही ठाकरे यांना दिला.
ठाकरे सरकारवरही टीका
फडणवीस सरकारपेक्षा आघाडीच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या तुलनेत महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात दलित महिलांवरील अत्याचारात 40 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे केंद्राने नुकताच जाहीर केलेल्या एका अहवालात म्हटले असल्याची माहिती देत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या प्रा. कवाडे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
संयुक्त रिप पक्ष भाईचारासाठी प्रयत्न...
राज्यात रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट आहेत. या सर्वांना एकत्र घेऊन संयुक्त निवडणूक लढविण्याच्या दुष्टीने प्रयत्न सुरु असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
नवीन मित्रांच्या शोध सुरु...
विद्यमान सरकारमध्ये सहभागी असलो तरी पार्टीला अडीच वर्षात सत्तेत अपेक्षित स्थान मिळेलेले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत नवीन मित्रांसोबत जाण्याच्या विचार सुरु आहे. त्यादृष्टीने शोध सुरू असल्याचा खुलासाही प्रा. कवाडे यांनी यावेळी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.