आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्केटिंग कंपन्यांकडून हाेणारा गैरवापर थांबणार:अल्पबचत भवनातून राजमुद्रा, जिल्हाधिकारी नावही हटवले

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन या शासकीय इमारतीत असलेली राजमुद्रा व जिल्हाधिकारी कार्यालय हे नाव जिल्हा प्रशासनाकडून हटवण्यात आले आहे. त्यामुळे मार्केटिंग कंपन्यांकडून राजमुद्रा व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाचा होत असलेला गैरवापर आता टळण्यास मदत हाेणार आहे.

‘खासगी मार्केटिंग कंपन्यांना साडेतीन हजारात सरकारी पाठबळ’ या शीर्षकाखाली ‘दिव्य मराठी’ने २५ नोव्हेंबर रोजीच्या अंकात सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. अल्पबचत भवनातील व्यासपीठाच्या पाठीमागे राजमुद्रा व त्याखाली जिल्हाधिकारी कार्यालय असे लिहिण्यात आलेले होते. साडेतीन हजार रुपयांत हे सभागृह कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्यात येत आहे. तेथे कार्यक्रम घेत असलेल्या मार्केटिंग कंपन्यांना आपसूक फायदा होत होता.

गैरफायदा घेण्याचीही शक्यता नाकारण्यात येत नाही, या आशयाचा मुद्दा त्या वृत्तातून मांडण्यात आला हाेता. त्याची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अल्पबचत भवनातील राजमुद्रा व जिल्हाधिकारी कार्यालय हे नाव काढून टाकण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील हिशेब शाखेला देण्यात आल्या. राजमुद्रेसह जिल्हाधिकारी कार्यालयाचे नाव आता भिंतीवरून काढून टाकण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...