आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरणात बदल:‘जीएमसी’तील राेजची आेपीडी साडेचारशेवर‎

जळगाव‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून सतत‎ होणाऱ्या‎ हवामानातील बदलामुळे‎ शहरात ताप व‎ सर्दी, खोकल्याचे रुग्ण ‎वाढले आहेत.‎ कधी अचानक थंडीत ‎वाढ, पाऊस‎,‎ तापमानातील चढ-उतार या कारणांनी‎ रोजच्या ओपीडीत सुमारे ६० टक्के रुग्ण हे‎ व्हायरल फ्लूचे समाेर येताहेत. आेपीडी‎ तीनशेहून साडेचारशेपर्यंत पाेहाेचली‎ आहे. त्यामुळे‎ शहरातील शासकीय‎ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह खासगी रुग्णालयात गर्दी वाढते आहे.‎

काही दिवसांपासून वातावरणात बदल‎ होत‎ असल्याने रुग्णसंख्येत वाढ‎‎ नोंदवण्यात आली आहे. सध्या‎ शहरात‎ सर्दी, खोकला, तापाची साथ‎ ‎आहे.‎ खासगी आणि‎ शासकीय रुग्णालयांतील ‎ ‎ बाह्यरुग्ण‎ विभागातील ओपीडी रुग्णांच्या‎ ‎ ‎ संख्येत नेहमीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी‎ वाढ झाली असल्याचे डाॅक्टर सांगताहेत.‎

घाबरू नका, तपासणी करा‎
वातावरणातील बदलांमुळे अंगदुखी,‎ डोके दुखणे, सर्दी, खोकला, सतत‎ शिंका‎ येणे, घसादुखी आदी त्रास होत आहे.‎ सध्या‎ वातावरणातील बदलामुळे‎ रुग्णसंख्या वाढली आहे. मात्र, आढळून‎ येणारे रुग्ण‎ काेराेनाचे नाहीत. नागरिकांनी‎ घाबरण्याचे कारण नाही. नवीन व्हायरस‎ असेलच असेही नाही. शहरात याबाबत‎ अजून तपासणी सुरू झालेली नाही.‎ - डॉ. निखिल पाटील, फिजिशियन‎‎

बातम्या आणखी आहेत...