आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वेलरी पॅटर्न, जरिसह लाइटिंगच्या राख्या बाजारात:इंदूर, अहमदाबाद, बडोदा, मुंबईहून आल्या राख्या; 800 रुपये डझनपर्यंत भाव

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉकडाऊनमुळे सन 2020 मध्ये कोरोनाच्या दहशतीत लाखो बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधू शकल्या नाहीत. तर 2021 मध्ये लॉकडाऊनमध्ये सवलत दिली असली तरी रक्षाबंधन कोरोनाच्या दहशतीतच साजरा करण्यात आले. मात्र, कोरोनामुळे रक्षाबंधनावर आधारित कारभारात निरुत्साह दिसून आला. यंदा मात्र व्यापाऱ्यांमध्ये रक्षाबंधनासाठी जबरदस्त उत्साह दिसून येत आहे.

घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांनी यंदा इंदूर, अहमदाबाद, बडोदा, मुंबईहून राख्या आणत दुकाने सजवली आहेत. यात सर्वच व्यापाऱ्यांनी चीनच्या मालाला दुर्लक्षित केल्याने बाजारात कुठेही चीनच्या राखी दिसत नाही.

शहरातील फुले मार्केटमधील राख्यांचे व्यापारी नंद पारप्यानी यांनी सांगितले की, जळगावात इंदूर, अहमदाबाद, बडोदा, मुंबईहून राख्यांची खरेदी केली आहे. या सर्वच ठिकाणांवर विविध प्रकार, आकाराच्या आकर्षक राख्या आहेत. यात ज्वेलरी पॅटर्न, जरिकाम, लाइटिंग, चमकदार वेस्टर्न, आकर्षक मण्यांनी मढवलेल्या, चंदनाचा सुगंध देणाऱ्या सुगंधी, चांदीत मिणा भरलेल्या राख्यांसह विविध फॅन्सी राख्यांनी बाजार भरल्याचे सांगितले.

रक्षाबंधनाला दहाच दिवस शिल्लक असल्याने महिलांनी बाहेरगावी असलेल्या भावासाठी स्पीड पोस्ट, कोरियर व टपालाने राखी पाठवायला सुरुवात केली आहे.

शहरात 15 ते 800 रुपये डझनपर्यंत राख्या

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून व्यापारी घाबरलेले होते. त्यामुळे या दोन वर्षांत खूपच कमी प्रमाणात राख्या मागवल्या. मात्र, यंदा सर्वप्रकारच्या राख्या व्यापाऱ्यांनी मागवल्या आहेत. शहरात 15 रुपये डझनपासून ते 800 रुपये डझन पर्यंतच्या राख्या बाजारात मिळत आहे. यात चायनीज राख्यांना बाजारात थारा नसल्याचा दावाही व्यापाऱ्यांनी केला आहे. 10 ते 20 हजार रुपयांचा माल खरेदी करणारे लहान व्यापाऱ्यांनी देखील थेट इंदूर, अहमदाबाद, बडोदा व मुंबईहून माल खरेदी करून आणला आहे.

या राख्यांची क्रेझ

बाजारात नवनवीन पद्धतीच्या, आकाराच्या आकर्षक राख्या आल्या आहेत. यात ज्वेलरी पॅटर्नच्या राख्या, जरिकामसह लाइटिंग असलेल्या राख्या, चमकदार वेस्टर्न, आकर्षक मण्यांनी मढवलेल्या राख्या, पटवा राख्या, चंदनाचा सुगंध देणाऱ्या सुगंधी राख्या, चांदीत मिणा भरलेल्या राख्यांसह विविध फॅन्सी राख्यां बाजारात विक्रीस आहे.

बातम्या आणखी आहेत...