आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सूचक’ खेळी:रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज बाद! राष्ट्रवादीचे एकनाथ खडसेंसह 6 बिनविरोध

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत गुरुवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली. यात भाजप खासदार व एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांचा अर्ज सूचकाची सही नसल्याने बाद झाला. मात्र, ही प्रक्रिया म्हणजे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची “धर्मसंकटातून’ सुटका करण्यासाठी “सूचक खेळी’ असल्याचे मानले जाते. कारण, रक्षा निवडणूक रिंगणात राहिल्या असत्या तर खडसेंना विरोधात प्रचार करावा लागला असता आणि निवडून आणायचे तर भाजपचा प्रचार करावा लागला असता. अखेर “सूचक’ निमित्त ठरले आणि यातून मार्ग निघाला.

निवडणुकीत २१ जागांसाठी २७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून १३० अर्ज बाद ठरले. आतापर्यंत महाविकास आघाडीने २१ पैकी ६ जागा बिनविराेध मिळवल्या आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या ४ तर शिवसेनेच्या २ जागांचा समावेश आहे.

एकनाथ खडसे बिनविरोध : मुक्ताईनगरच्या सोसायटी मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या विरोधात अपक्ष नाना पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांनीही माघार घेतली. अमळनेर साेसायटी मतदारसंघात भाजप उमेदवार माजी आमदार स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने तेथे आ. अनिल पाटील हे एकमेव उमेदवार आहेत.

नणंद-भावजय भिडल्या असत्या
भाजपच्या वतीने रक्षा खडसे निवडणूक रिंगणात असत्या तर महिला राखीव मतदारसंघातून खा. रक्षा आणि त्यांच्या नणंदबाई रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यात सामना रंगला असता. या स्थितीत एकीकडे सून आणि दुसरीकडे मुलगी, हा पेच एकनाथ खडसे यांच्यासमोर होताच. परंतु, सूचकाच्या सहीअभावी रक्षा खडसेंचा अर्ज बाद झाला आणि पेचही सुटला, अशी स्थिती आहे.

बातम्या आणखी आहेत...