आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅली‎:गोदावरी नर्सिंग काॅलेजतर्फे कर्करोग दिनानिमित्त रॅली‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे‎ जागतिक कॅन्सर दिनानिमित्‍त‎ तरसोद येथे कॅन्सर जनजागृती व‎ प्रतिबंध कसा घालावा यासाठी‎ विद्यार्थ्यांनी रॅली काढली होती.‎ तसेच या निमित्ताने विद्यार्थ्यांनी‎ पथनाट्य सादर करून जनजागृती‎ केली.‎ रॅलीत अवयवांना होणाऱ्या‎ कर्करोगाबाबत जनजागृती करण्यात‎ आली.

विद्यार्थ्यांनी विविध‎ घोषवाक्यांचा वापर करत गावातून‎ रॅली काढली. धूम्रपान व मद्यपान‎ टाळण्याकरिता विविध संदेश‎ पोस्टर्स तसेच पथनाट्याद्वारे सादर‎ करण्यात आले. हा उपक्रम प्रमुख‎ प्रा. मनोरमा कश्यप यांच्या‎ मार्गदर्शनात प्रा. सागर मसने, प्रा.‎ प्रशिक चव्हाण, प्रा. रश्मी टेंभुर्णे, प्रा.‎ शुभांगी गायकवाड, प्रा. पुनम‎ तोडकर, प्रा. प्रीती गायकवाड, प्रा.‎ दीपाली गोटे यांनी कार्यक्रम घेतला.‎

बातम्या आणखी आहेत...