आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंद सोहळा:मातोश्री वृद्धाश्रमामध्ये रंगला आनंद सोहळा  ; सगळे पाहून मनमुराद हसत होते

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीएसआर अंतर्गत रायसोनी महाविद्यालयाच्या रोटरॅक्ट क्लब रायसोनी इलाइटतर्फे विद्यार्थ्यांनी मातोश्री वृद्धाश्रमात आनंद सोहळा साजरा केला. त्यात कुणी खेळत होते, कुणी गाण्यांच्या ठेक्यावर बेभान होऊन नाचत होते, कुणी हे सगळे पाहून मनमुराद हसत होते तर कुणी भरवलेला घास मनापासून खात उपस्थितांचे कौतुक करत होते. आयुष्यात वाट्याला आलेले दु:खाचे प्रसंग विसरून गप्पा मारता मारता हा आनंद सोहळा रंगला.

सुरुवातीला या आजी-आजोबांच्या डोळ्यांत दु:खाची किनार होती. पण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवूनच जायचे, असे या युवकांनी ठरवले होते. सर्वप्रथम त्यांनी सर्व ज्येष्ठांना हॉलमध्ये एकत्र केले आणि मनोरंजक खेळ सुरू केले. बादलीत चेंडू टाकणे, चिठ्ठीद्वारे चित्रपटातील डायलॉग व जुनी गाणी म्हणणे अशा स्पर्धांत तेथील वृद्धांनी उत्साहाने सहभाग घेतला. या वेळी साक्षी वाणी या विद्यार्थिनीने अनेक पारंपरिक व देशभक्तीपर गीते सादर करून वृद्धांना गाण्याच्या ठेक्यांवर नाचायला लावले. या वेळी गौरव कोगटा यांच्यातर्फे वृद्धाश्रमातील वृद्धांना काही जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व अल्पोपाहार देण्यात आला. या वेळी प्रा. योगिता पाटील, प्रा. मोनाली शर्मा, यश लाद्ध, लोकेश पारेख, संदेश तोतला, विवेक वाणी, तुलसी सोनी, ध्यानल बोरोले, दिशा काटकर, अंकिता गुप्ता, प्रगती नेवे, काजल बारी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...