आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१८ मेपासून सुरुवात:बीड, परभणी, नांदेड, नगरसह सहा जिल्ह्यांमध्ये ‘नारी’तर्फे रॅपिड टेस्ट

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काेराेना राेखण्यासाठी युद्धपातळीवर उपायोजनेला सुरुवात

देशात काेविड-१९ चा फैलाव वेगाने हाेत आहे. काेराेनाचा प्रसार राेखण्यासाठी लवकर निदान हाेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पुणे येथील आयसीएमआरची शाखा असलेल्या ‘नारी’ या संस्थेतर्फे १८ मेपासून तीन दिवस राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये काेराेनाची रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहे. ही रॅपिड टेस्ट राज्यात जळगावसह, बीड, परभणी, नांदेड, अहमदनगर व सांगली या सहा जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार आहे.

देशात विषाणू तपासणी व संशाेधनासाठी कार्य करणाऱ्या पुणे येथील आयसीएमआर (इंडियन काैन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च) या संस्थेचा भाग असलेल्या नारी (नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट) ही संस्था राज्यातील ६ जिल्ह्यांत टेस्ट करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील दहा गावांमध्ये ही रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यास्तरावरील यंत्रणेला साेबत घेऊन जिल्ह्यातील निश्चित केलेल्या गावात रँडमली नागरिकांची तपासणी करून सॅम्पल घेणार आहेत. हे सॅम्पल पुणे व्हायरालाॅजी विभागाला पाठविणार आहे. तर, त्याचा अहवाल केंद्राला पाठविण्यात येणार आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक नाेडल ऑफिसर :

राज्यातील सहा जिल्ह्यांच्या रॅपिड टेस्टसाठी आयएमआरसीचे संचालक तथा पुणे येथील टीबी आणि कृष्ठराेग विभागाच्या सहसचिव डाॅ. पद्मजा बनगर यांची राज्याच्या नाेडल ऑफिसर म्हणून नियुक्ती होईल.

जिल्ह्यात दहा ठिकाणी पाच दिवस हाेणार रॅपिड टेस्ट...

जिल्ह्यतील ९ तालुक्यांतील १० गावांमध्ये ही रॅपिड टेस्ट करतील. जळगाव शहरात, तालुक्यातील कडगाव, यावल तालुक्यातील माेहराळे, रावेर तालुक्यातील तांदलवाडी, धरणगावातील ग्रामीण भाग, भडगाव तालुक्यातील वरखेड, पाचाेरा तालुक्यातील नाईकनगर, जामनेर तालुक्यातील गाेराडखेडे, भुसावळ शहर व चाळीसगाव शहराचा समावेश आहे. ही रॅपिड टेस्ट १८ ते २२ मार्च अशी पाच दिवस चालणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नारीचे १५ प्रतिनिधी १७ मे राेजी दाखल हाेणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...