आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वन्यजीव:नंदुरबारमध्ये आढळून आले पाच दुर्मिळ घुबड, लॉकडाउनच्या काळात वन्यजीव पाहायला मिळत आहेत

नंदुरबारएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वन विभागाकडून वैद्यकीय तपासणी करून सुरक्षित वनक्षेत्रात सोडण्यात आले

लॉकडाऊनमुळे अनेक वन्यजीव आढळून येत आहेत. तळोदा पाठोपाठ आता नंदुरबारलादेखील एकूण पाच घुबड आढळून आले असून वन विभागाने त्यांची वैद्यकीय तपासणी करून सुरक्षित वनक्षेत्रात सोडण्यात आले आहे.

भाऊसाहेब थोरात नंदुरबार तहसीलदार, गोपाळ पाटील नायब तहसीलदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेज नंदुरबार जगताप वाडी वनकर्मचारी व आकाश राजेंद्र जैन अलर्ट फाउंडेशन नंदुरबार यांनी घटनास्थळी जाऊन सुमारे पाच तपकिरी घुबड (ब्राऊन ऑल), पशुवैद्यकीय अधिकारी नंदुरबार यांच्याकडून सदर पक्षांची तपासणी करून त्यांना विटामिन्स व औषध उपचार करून सध्या ठाणेपाडा रोपवाटिका येथे निरीक्षणामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. पाच पक्षांमधील एक पक्षाची तब्येत नाजूक असल्याने ऑब्झर्वेशन मध्ये आहे.

संक्रांतीच्या काळात आकाश जैन जैन अलर्ट फाउंडेशन फाउंडेशन नंदुरबार व वन कर्मचारी यांनी सुमारे 35 पक्षांचे रेस्क्यू करण्यात आले होते. लॉक डाऊन काळामध्ये वन कर्मचारी यांनी सुमारे 11 नाग व दोन मांडूळाची रेस्क्यू करण्यात आले आहेत. 

साधारणपणे नोव्हेंबर ते मार्च-एप्रिल हा काळ पिंगळा पक्ष्यांचा वीणीचा काळ असून त्यांचे घरटे झाडाच्या ढोलीत, जुन्या इमारतीच्या छिद्रात, कडे-कपारीत, छताजवळ मिळेल त्या साधनांनी बनविलेले असते. किंवा त्याचे वास्तव्य दुसऱ्या पक्ष्यांनी सोडून दिलेल्या तयार घरट्यात असते. मादी एकावेळी ३ ते ४ पांढुरक्या रंगाची अंडी देते. अंडी उबविण्यापासून पिलांच्या संगोपनापर्यंत सर्व कामे नर-मादी मिळून करतात.

पिंगळा पक्षी आकाराने साधारणपणे मैना पक्ष्याएवढा (२१ सें. मी.) असतो. याचा मुख्य रंग करडा-तपकिरी असून त्यावर पांढरे ठिपके असतात. या ठिपक्यांवरूनच याला ठिपकेवाले घुबड असेही म्हणतात. याचे डोके गोल-वाटोळे असते आणि मानेवर तुटक पांढर्‍या रेषा असतात. याची चोच बाकदार, शिकार पकडण्यासाठी आणि मांस फाडण्यासाठी उपयुक्त, तर डोळे पिवळे असतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात.

सर्व घुबडांप्रमाणेच पिंगळा सुद्धा आपली मान दोन्ही बाजूंनी १८० अंश फिरवू शकतो, यामुळे एकाच जागी बसला असतांनाही तो क्षणात त्याच्या मागे काय घडत आहे ते पाहू शकतो. अंधारात राहण्यासाठी कान आणि डोळे अनुकूल झाले असल्याने लहानात लहान आवाजाच्या दिशेनेही पिंगळा पक्षी रोखून पाहतो. दरम्याम लॉक डाऊन काळात वन्यजीव ठीक ठिकाणी आढळून येत आहेत, अशी माहिती उप वन संवरक्षक गणेश रणदिवे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...