आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारतनलाल सी. बाफना फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने दिला जाणाऱ्या ‘आचार्य हस्ती अहिंसा कार्यकर्ता’ पुरस्काराने राजस्थानातील जोधपूर येथील ८२ वर्षीय सुशीला बाेहरा यांना रविवारी सन्मानित करण्यात आले. स्मृतिचिन्ह आणि पाच लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.सन १९९८ पासून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे यंदा ३५ वे वर्षे होते.
रविवारी जळगाव शहराच्या नजीक असलेल्या कुसुंबास्थित अहिंसा तीर्थ गोशाळेच्या सुशील सभागृहात त्यांना माजी खासदार ईश्वरलाल ललवाणी व मान्यवरांच्या हस्ते अहिंसा ऑर्डने सन्मानित करण्यात आले. या वेळी कांतिलाल चौधरी (धुळे), श्रीमती तारादेवी रतनलाल बाफना, कस्तूरचंद बाफना, कंवरलाल संघवी, सज्जनराज बाफना, सुशीलकुमार बाफना, सागरमल सेठिया, संदीप जैन, सुनीलकुमार बाफना, हेमंत कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते.बाफना यांच्या अनुपस्थितीत आचार्य हस्ती अवॉर्डचे पहिल्यांदाच वितरण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा पारख व अनामिका कोठारी यांनी केले. पुरस्कारार्थी सुशीला बोहरा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार सुशीलकुमार बाफना यांनी मानले.
निवड समिती सोबतच्या चर्चेचा व्हिडिओ
विशेष म्हणजे बाफनाजींनी स्वतः निवड समितीसोबत चर्चा करून श्रीमती सुशीला बोहरा यांची निवड केली होती. त्यांना निवड केल्याबाबत व त्यांच्या कामाचा गौरव करण्याबाबतचा शुभेच्छापर व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड करून ठेवला होता. या सोहळ्यात उपस्थित असलेल्यांना हा व्हिडिओ दाखवण्यात आला.
बाेहरा बनल्या सात हजार कुटुंबांचा आधार
यावर्षी जोधपूरच्या सुशीला बोहरा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुशीला बोहरा यांनी संकटग्रस्त विधवा महिला, नेत्रहीन, मूकबधिर, मानसिक रुग्णांसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. सात हजार महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून त्यांना स्वयंरोजगार प्राप्त करून दिलेला आहे. अनाथ नवजात शिशूंसाठी लवकुश बालविकास केंद्रामार्फत कार्य करत आहेत. सोबतच करुणा क्लबमार्फत अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपणाचे मोठे काम त्यांनी करवून घेतले आहे. त्यांना राष्ट्रपती यांच्या हस्तेही सन्मानित करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.