आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंचित:पुरवठा विभागातील आरसीएमएस प्रणाली बंद; शिधापत्रिकाधारक लाभापासून वंचित

पाचोरा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तहसीलदार कार्यालयातील (आरसीएमएस) ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली तीन महिन्यांपासून बंद असल्याने नागरिक स्वस्त धान्यापासून वंचित आहे. ही प्रणाली बंद असल्याने पिवळ्या व केसरी कार्डावर अनेक आजारांवर मोफत वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करुन आरोग्य सुविधा घ्याव्या लागत आहेत.

पाचोरा तहसीलदार कार्यालयात दररोज ४० ते ५० नागरीक विविध कामे करून घेण्यासाठी येत असतात मात्र पुरवठा विभातील आरसीएमएस प्रणाली बंद असल्याने ते नागरिक संबधित कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतांना पहावयास मिळत आहे. अनेकवेळा त्यांच्यातील वाद टोकाला जात असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

तालुक्यासह संपूर्ण जिल्हयात केसरी व पिवळ्या कार्डावर धान्य मिळण्यासाठी १२ अंकी नंबर घेणे, तो मिळाल्यानंतर आरसीएमएसद्वारे रजिस्ट्रेशन करणे, मुलामुलींचे विवाह झाल्यानंतर माहेरचे नाव ऑफलाईन कमी केले असले तरी ते ऑनलाईन कमी करणे, पाल्यांचे नाव समावेश करणे, आरोग्य सुविधेसाठी ऑनलाईन दाखले घेणे यासाठी ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीची गरज भासत असते मात्र पाचोरा येथील पुरवठा विभागात गेल्या तीन महिन्यांपासून ही प्रणाली बंद असल्याने प्रचंड हाल होत आहे.

चिंचखेडा बुद्रुक येथील उपसरपंच व पाच ते सात नागरिक गेल्या दोन महिन्यापासून बारा अंकी नंबर घेणे व विवाहीत मुलीचे नाव ऑनलाईन कमी करण्यासाठी हेलपाट्या मारत आहेत मात्र सोमवारपर्यंत काम न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...