आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाशी संलग्न असलेल्या राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणात डिजिटल हेल्थ एज्युकेशन देण्यासाठी राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या सहयोगाने मिक्स रिअॅलिटी मॉड्युल्स तयार केले आहे. या माध्यमातून हॅलो लेन्सच्या मॉड्यूल्सद्वारे रिअल-टाइम रिमोट टिचिंग आणि हेल्थकेअर समस्या सोडवणे शक्य होणार आहे.
राज्यात जळगावसह २४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहे. येथे सुमारे ५ हजार विद्यार्थी एमबीबीएस पदवी अभ्यासक्रमाचे तर अडीच हजार पदव्युत्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहे. जागतिकस्तरावर वैद्यकीय शैक्षणिक संस्थांमध्ये रिअल टाइम रिमोट टिचिंग आणि हेल्थकेअर या विषयांना तंत्रज्ञानुसार अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय शिक्षणात तंत्रज्ञान व रिअॅलिटी प्लॅटफॉर्मवर आधारित मॉड्युल्सचा वापर झाल्यास वैद्यकीय अभ्यासक्रमात संशोधनाला चालना मिळेल.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य सेवा सुधारल्यानंतर मात्र ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या मॉड्युल्सद्वारे विविध तज्ञ डॉक्टरांचे मदत घेणे उपचारकर्त्या डॉक्टरांना शक्य होईल. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी आरोग्य यंत्रणा जोडून यातून ग्रामीण आरोग्य सेवा सक्षम करता येईल असे तज्ज्ञांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलतांना सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.