आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार छाया देवकर ७१ मतांच्या मताधिक्यांने विजयी झाल्या आहेत. पक्षाच्या दुसऱ्या उमेदवार मंदाकिनी खडसे मात्र ७६ मतांनी पराभूत झालेल्या आहेत. एकाच पॅनलच्या दाेन उमेदवारांच्या मतांमध्ये असलेल्या फरकामुळे सध्या राष्ट्रवादीत पराभवाचा पंचनामा गाजताे आहे. या दाेन्ही उमेदवारांना जिल्हाभरात मिळालेली मते पाहता पराभवाची कारणे शाेधली जाताहेत.
गेल्यावर्षी झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या दावेदार असलेल्या राेहिणी खडसेंना एेनवेळी शह देत गुलाबराव देवकरांनी बँकेचे अध्यक्षपद मिळवले हाेते. त्यानंतर दूध संघ निवडणुकीत रावेर लाेकसभा मतदारसंघात प्रभाव असणारे आमदार एकनाथ खडसे आणि जळगाव लाेकसभा मतदारसंघात प्रभाव असणारे गुलाबराव देवकर दूध संघ निवडणुकीत एकत्रित आले हाेते. दाेन्ही नेत्यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणात तर निवडणुकीतील पॅनलची सूत्रे या दाेन्ही नेत्यांच्या हाती हाेती. दाेघांवरही पॅनलची जबाबदारी असताना निवडणुकीत मंदाकिनी खडसे पराभूत झाल्या असून छाया देवकर विजयी झाल्या आहेत.
दाेन्ही उमेदवारांच्या जय-पराजयांची नव्हे तर त्यांना मिळालेली मते राष्ट्रवादीच्या निवडणुकीच्या पंचनाम्यात कळीचा मुद्दा ठरले आहे. मतदारसंघ वेगळे असले तरी दाेघांचेही मतदार मात्र एकच हाेते. त्यामुळे दाेन्ही उमेदवारांच्या मतदान केंद्रनिहाय मतात माेठी तफावत दिसत आहे. या निवडणुकीत देवकरांना विजयासाठी भाजप-शिंदेसेनेच्या पॅनलकडून मदत झाली की देवकरांकडून वैयक्तीक प्रचार करण्यात आला याबाबतची कारणे पक्षातील कार्यकर्त्यांकडून शाेधली जात आहेत. जिल्हा दूध संघाची निवडणूक अनेक कारणांमुळे गाजली. त्याच मंदाकिनी खडसे यांचा पराभव खडसे यांना बसलेला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. त्याची कारणमिमांसा जाणकारांकडून केली जात आहे.
जळगाव-पाचाेऱ्यात दुप्पट मतांचा फरक जळगाव मतदान केंद्रावर मंदाकिनी खडसे यांना छाया देवकरांच्या तुलनेत २० मते कमी आहेत. पाचाेऱ्यातही हा फरक १९ मतांचा आहे. या दाेन्ही केद्रांवर खडसेंना ३९ मते कमी पडली. अमळनेरमध्ये ४ मते, स्वत:चा मतदारसंघ असलेल्या भुसावळात खडसेंना देवकरांपेक्षा ७ मते कमी आहेत. चाळीसगावात दाेघांच्या मतांमध्ये ९ तर फैजपुरमध्ये एका मताचा फरक आहे. त्याचे विश्लेषण केले जातेय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.