आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसे यांना विश्‍वास, म्‍हणाले:शिवसेनेचे बंडखाेर आमदार अपात्र होणारच; शिंदे-फडणवीस सरकार काेसळेल

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेतून बंडखाेरी करून राज्यात अस्तित्वात आलेले शिंदे-फडणवीस सरकार टिकणे कठीण नव्हे तर अशक्य आहे. कायदेतज्ज्ञ, अभ्यासक आणि आतापर्यंतच्या अरुणाचल प्रदेशसारख्या केसेसचा अभ्यास केला तर हे सरकार काेसळेल हे मी नव्हे, तर कायदाच सांगताे, असा दावा राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला. साेबतच बंडखाेर आमदारही अपात्र ठरतील, असे त्यांनी जळगावात त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बाेलताना सांगितले.

सरकार स्थापन करून दाेन दिवस हाेत नाही ताेच नव्या सत्ताधाऱ्यांनी ओबीसी आरक्षणाचे श्रेय घेतले हाेते. मग आता नगरपंचायतीमध्ये आेबीसींना आरक्षण मिळाले नाही हे श्रेयदेखील त्यांनीच घेतले पाहिजे. त्यांच्यामुळेच ओबीसी वंचित राहणार असा आराेपही खडसे यांनी केला.

मग तातडीने मदत का नाही?
मुख्यमंत्री आधीच्या विकासकामांना तातडीने स्थगिती देत आहेत. तेवढ्याच तातडीने ओल्या दुष्काळातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना ते मदत का करीत नाहीत? पालकमंत्री नसल्याने अनेक अडचणी आहेत. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट असताना शासन मात्र स्वत:तच हरवले आहे. शेतकऱ्यांना कुणी वाली नाही, असे खडसे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...