आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा एजंटांची मुलाखतीद्वारे नियुक्ती:पाेस्टात विमा एजंटांची आता थेट मुलाखतीद्वारे नियुक्ती

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद डाक विभागात डाक जीवन विमा, ग्रामीण डाक जीवन विमा एजंट थेट मुलाखतीद्वारे नियुक्ती हाेणार आहेत. त्यासाठी उमेदवाराचे वय १८ ते ५० असावे. अर्जदार हा किमान दहावी उत्तीर्ण अथवा केंद्र, राज्य सरकार मान्यताप्राप्त समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. सुशिक्षित बेरोजगार, निवृत्त शिक्षक, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, माजी जीवन विमा सल्लागार, इतर विमा कंपन्याचे माजी अभिकर्ते, स्वयंरोजगार किंवा उपरोक्त पात्रता असलेले इच्छुक असावे. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्त्व, जीवन विम्याबाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान तसेच स्थानिक परिसराची माहिती इत्यादी बाबी आवश्यक आहे. इच्छुकांनी अधीक्षक, डाकघर, औरंगाबाद विभाग, जुना बाजार, औरंगाबाद या कार्यालयात आवश्यक मूळ कागदपत्रे, त्या कागदपत्रांची एक साक्षांकित प्रत,आधारकार्ड व दोन पासपोर्ट छायाचित्र व अर्ज १० ऑगस्ट सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

बातम्या आणखी आहेत...