आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंतापदासाठी महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगातर्फे २०१९ मध्ये परीक्षा घेण्यात आली हाेती. त्यात पात्र ठरलेल्या २३३ उमेदवारांना सहायक अभियंता पदावर सरळसेवेने नियुक्ती देण्यात आली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील रिक्त असलेल्या एकूण नऊ जागांवर नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्ती केलेल्या उमेदवारांचा दाेन वर्षांचा परिविक्षाधीन कालावधी राहणार आहे. नियुक्तीनंतर महिनाभरात रूजू न झाल्यास नियुक्ती रद्द केली जाणार आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यातील नऊ ठिकाणांवरील सहायक अभियंता पदे रिक्त हाेती. त्यामुळे कामांवर देखील परिणाम हाेत हाेता. शासनाच्या या आदेशामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात नऊ अभियंत्यांची वाढ झाली. त्यामुळे दिलासा मिळाला. दरम्यान, जी काही कामे रखडलेली असतील ती या नियुक्तीमुळे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी माेठी मदत हाेणार असल्याचे सांगण्यात येते आहे.
यांची करण्यात आली नियुक्ती जिल्ह्यातील रिक्त असलेल्या एरंडाेल येथे माेहरे विकास अशाेक, मुक्ताईनगर येथे चासकर सुरेश भास्कर, जळगाव येथे हर्षल विश्वास पाटील, यावल येथे चाैधरी विपुल लक्ष्मण, जळगाव येथे देवरे विशाल महेंद्रसिंह, जळगाव येथे कुवर स्वाती हिम्मत, भडगाव येथे घाेरपडे प्रियंका शांताराम, जळगाव येथे वारे भक्ती संजय, धरणगाव येथे पाटील यशाेधन बिपीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.