आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाश आभ्राच्छादित:धूलिकणांच्या प्रमाणात घट; किमान तापमान 21 अंशांवर

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात विविध भागांत पावसाने हजेरी लावली. पावसाचा शिडकावा झाल्याने हवेतील धूलिकणांचे प्रमाण घटले आहे. हवेची गुणवत्ता (एअर क्वाॅलिटी इंडेक्स) प्रथमच ३९च्या पातळीवर आला. आकाश ६१ टक्के ढगाच्छादित असून, किमान तापमान चाैथ्या दिवशी २१.४च्या उच्चांकावर असून थंडी गायब झाली.

गेल्या रविवारपासून जिल्ह्यात वातावरण बदलले आहे. ढगाळ वातावरणात थंडी गायब झाली असून, किमान तापमान सातत्याने २१ अंशांवर स्थिरावले आहे. परिणामी वातावरणात उकाडा वाढला आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात धूलिकणांचे प्रमाण वाढल्याने जळगाव शहरात एअर क्वाॅलिटी इंडेक्स १६४च्या उच्चांकावर गेला हाेता; परंतु सलग तिसऱ्या दिवशी काेठे ना काेठे पाऊस हजेरी लावत आहे. या काळात जळगाव शहरातही तुरळक पाऊस झाला. पावसामुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण घटले. हवेप्रमाणे मातीत आर्द्रता वाढली.

बातम्या आणखी आहेत...